Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ७५ कोटींच्या चिचोली ते देव्हाडी सिमेंट रस्त्याची दुरवस्था झाली असून, कंत्राटदाराने केलेल्या डांबराच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 24, 2026 | 06:02 PM
Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम
Follow Us
Follow Us:
  • चिचोली ते देव्हाडी सिमेंट रस्त्याची दुरवस्था लपवण्यासाठी कंत्राटदाराने शास्त्रीय दुरुस्तीऐवजी डांबराची तात्पुरती ‘मलमपट्टी’ केली.
  • तुमसर तहसील ते सुभाषचंद्र बोस चौक दरम्यान दर पावसाळ्यात पाणी साचत असून, पादचारी व विद्यार्थ्यांवर चिखल उडाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
  • १० वर्षांची देखभालीची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य अभियंत्यांकडे तक्रार दाखल.

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिचोली ते देव्हाडी या २१ किलोमीटरच्या राज्यमार्गावर कंत्राटदाराचा मनमानी कारभार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आजही कायम आहे. शासनाच्या हायब्रिड अॅन्यूटी योजनेंतर्गत सुमारे ७५ कोटी रुपयांच्या भरभक्कम निधीतून तयार करण्यात आलेल्या या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर आपले अपयश झाकण्यासाठी बांधकाम कंपनीने एक वर्षांपूर्वी चक्क डांबराचे पट्टे मारून थातूरमातूर दुरुस्ती केली होती. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही ही समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सदर रस्ता भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याचे आरसीसी काँक्रीटीकरण २०२० मध्ये पूर्ण झाले असून, ‘शिवालय भंडारा-नागपूर महामार्ग कन्स्ट्रक्शन’ कंपनीला या रस्त्याची १० वर्षे देखभाल व दुरुस्ती करायची आहे. बावनकर चौक ते महावितरण कार्यालयापर्यंतच्या भागात खराब झालेल्या काँक्रिटवर नव्याने काँक्रिटीकरण करण्याऐवजी कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी डांबराचे थर देऊन तात्पुरती मलमपट्टी केली होती. परंतु, या चुकीच्या दुरुस्तीमुळे रस्ता पूर्ववत होण्याऐवजी त्याची

Neral Power Outage: तीन दिवसांपासून नेरळचा वीजपुरवठा खंडित; महेंद्र थोरवे मैदानात, अधिकाऱ्यांना फटकारले

दर पावसाळ्यात पाण्याचे डबके

विशेषतः, तुमसर तहसील कार्यालय ते सुभाषचंद्र बोस चौकादरम्यान पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. या समस्येबाबत १३ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर तक्रार करण्यात आली होती. त्यानतर प्रशासनाने केवळ डांबराचा लेप लावून मोकळे होण्याचे काम केले. मात्र, आज एक वर्ष उलटूनही या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही.

दुरवस्था अधिकच वाढली आहे.

पावसाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी व पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल-पाणी उडत असल्याने दररोज नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भांडणे होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या अनास्थेविरोधात थेट सार्वजनिक बांधकाम

Dharashiv मध्ये कडकडीत बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ RPI, रिपब्लिकन सेना आणि वंचित आघाडी रस्त्यावर

प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. १ वर्षापूर्वी केलेल्या त्या थातूरमातूर दुरुस्तीचा तीव्र निषेध नोंदवत, रस्त्याची नियमानुसार शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करण्याची, पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी ड्रेनेज लाईन उभारण्याची आणि कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

Web Title: Chicholi devhadi state highway pwd complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.