Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

महाराष्ट्रात ८ जुलै २०२६ पर्यंत पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 06, 2026 | 05:34 PM
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा (Photo Credit- X)

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा
  • तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या
  • नाहीतर…
Devendra Fadnavis Work From Home Order: मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस, म्हणजेच ८ जुलै २०२६ च्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ (Red Alert) कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासगी कंपन्या आणि आस्थापनांना अत्यंत कडक निर्देश जारी केले आहेत.

मानवतेच्या दृष्टिकोनातून ‘वर्क फ्रॉम होम’ द्या; मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “सद्यस्थिती पाहता खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (WFH) सवलत द्यावी. प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ज्या कंपन्या किंवा आस्थापना या शासकीय निर्देशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” तसेच, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आग्रहाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

🕜 1.18pm | 6-7-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/SvLASJ3OuE — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2026

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर युद्धपातळीवर काम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना आणि आपत्कालीन यंत्रणांना २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून माती आणि मोठमोठे दगड मुख्य रस्त्यावर आले आहेत. या ठिकाणी ढिगारा उपसण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, वाहतूक कोंडी तातडीने सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?

सुप्रिया सुळेंचा संताप

मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुंबई-पुणे दळणवळण ठप्प झाले आहे. याच गंभीर परिस्थितीचा दाखला देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. पावसामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि मोठे नुकसान पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तातडीने ‘आणीबाणी’ जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

असं चित्र महाराष्ट्रात कधीच नव्हतं – सुप्रिया सुळे

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात यापूर्वीही पाऊस झाला आहे आणि मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं भयानक चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून अतिशय चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय आहे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाष्य करणे आवश्यक आहे.

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Web Title: Chief minister issues a stern warning to private companies amidst heavy rains immediately allow work from home or els

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Rain
  • Mumbai Rain
  • Work From Home

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
3

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
4

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.