Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल्याप्रमाणे हा निसर्गाचा मोठा प्रकोप असून ही अभूतपूर्व परिस्थिती आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 05:06 PM
Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात 
मंत्री लोढा यांची आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट 
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा 

मुंबई: गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, मुंबईकरांनी संकटसमयी प्रशासनाला केलेले सहकार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या प्रसंगी सभागृह नेता गणेश खणकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा – लवंगारे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे (IAS), उपायुक्त (आरोग्य) शरद उघडे आणि महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल्याप्रमाणे हा निसर्गाचा मोठा प्रकोप असून ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. एकाच दिवसात शहरात ३५० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही महानगरपालिकेचे डिषास्टर डिपार्टमेंट आणि सरकारी यंत्रणा अत्यंत वेगाने आणि *युद्ध पातळीवर* रस्त्यांवरील झाडे हटवणे व पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक… pic.twitter.com/ymcHjvMgkw — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 6, 2026

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय

नागरिकांची, विशेषतः लांबच्या अंतरावरून प्रवास करणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने पावले उचलली आहेत. एक आवश्यक खबरदारीचा उपाय (Precautionary Measure) म्हणून सकाळी शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात सरकारी कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल.

मुंबई थांबलेली नाही; जनजीवन सुरळीत

मंत्री लोढा यांनी अत्यंत सकारात्मकता व्यक्त करत सांगितले की, एवढ्या मोठ्या संकटानंतरही मुंबई कुठेही थांबलेली नाही. खबरदारीमुळे लोकल रेल्वेचा वेग काहीसा संथ असला तरी वाहतूक पूर्णपणे सुरू आहे. रस्त्यांवरील पाणी आणि झाडे पूर्णपणे साफ करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत.

Mumbai Rain : ‘सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना…’, IMD चा रेड अलर्ट; ९० किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा, WFH चे निर्देश

अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक

“गेल्या तीन दिवसांपासून महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र एक करून ऑन-फील्ड काम करत आहेत. संकटसमयी राजकारण न करता आपण सर्वांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि त्यांच्या या अविरत परिश्रमांचे कौतुक (Appreciation) केले पाहिजे,” असे आवाहन मंत्री लोढा यांनी या वेळी केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्वांना व्हॉट्सॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवण्यात आले असून, पुढील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

Web Title: Mangal prabhat lodha statement about mumbai heavy rain and situation weather alert in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Abu Azmi on Mankhurd Incident: मानखुर्द दुर्घटनेतील ६ मृत्यू प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच; अबू आझमी यांचा खळबळजनक आरोप
1

Abu Azmi on Mankhurd Incident: मानखुर्द दुर्घटनेतील ६ मृत्यू प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच; अबू आझमी यांचा खळबळजनक आरोप

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…
2

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा; तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’ द्या, नाहीतर…

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन
3

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी
4

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.