Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ता बदल झाल्यास…; मुख्यमंत्री सिद्धरामय्या नेमकं काय म्हणाले?

मोदींची सत्ता गेल्यानंतरच देशात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2024 | 12:51 PM
सत्ता बदल झाल्यास…; मुख्यमंत्री सिद्धरामय्या नेमकं काय म्हणाले?
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : दहा वर्षांपूर्वी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ-सब का विकास’ अशी खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. परंतु त्यांच्या एवढा खोटा पंतप्रधान देशात झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही. मोदींची सत्ता गेल्यानंतरच देशात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

पंढरपूर-मंगळवेढा आणि अक्कलकोट या दोन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले होते. मंगळवेढ्यात आयोजित सभेत त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती.

सिद्धरामय्या म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर हे मंगळवेढ्यात १५ वर्षे राज दरबारात मंत्री म्हणून काम करीत होते. त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित, दीन-दलितांसह सर्व घटकांना एकत्र आणून मानवतेची शिकवण देण्यासाठी लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यादृष्टीने मंगळवेढ्याचे महत्त्व खूप मोठे आहे, याचा उल्लेख केला. काँग्रेसने महात्मा बसवेश्वरांच्या सर्व समावेशक विचारांनीच काम केले आहे. महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत असलेली राज्यघटना काँग्रेसनेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून देशाला दिली. संविधानानुसार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करणारा एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला.

हे सुद्धा वाचा : शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…

बड्या भांडवलदारांच्या हितासाठी दहा वर्षात कारभार

सिद्धरामय्या म्हणाले, राज्यघटना मान्य नाही. केवळ उच्चवर्णीय आणि बड्या भांडवलदारांच्या हितासाठी भाजपने गेल्या दहा वर्षांत कारभार केला आहे. वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन, जनतेची दिशाभूल करून, जातीधर्मात तेढ निर्माण करून सत्ता काबीज करणे हेच भाजपचे प्रमुख ध्येय राहिले आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.

हे सुद्धा वाचा : शंकर जगताप यांना निवडून द्या, मी तुमच्यासाठी…; नितीन गडकरी यांचं मोठं आश्वासन

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती, महाविकास आघाडी, मनसे आणि अन्य पक्षाच्या सभा, मेळावे, रॅली काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करित आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Chief minister siddaramaiah has criticized the bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र
3

Rahul Gandhi News: माजी न्यायाधीशांपासून नोकरशहांपर्यंत…; 272 जणांचे राहुल गांधींना खुले पत्र

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
4

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.