राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला
सासवड : विधानसभा निवडणुकीत उभे राहायचे आहे, असे सांगितले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत संजय जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्या पद्धतीने मदत केली, त्या पद्धतीने त्यांना तिकीट देणे आवश्यक होते हे त्यांना सांगितले होते. त्यामुळे आमचे जोडीदार नाराज झाले. तुम्ही अधिकारी झालात, सेवा निवृत्तीनंतर पक्षासाठी आणि समाजासाठी काम करता यासाठी तुमचा सन्मान करतो. मात्र एकदा निर्णय झाला की तो बदलता येत नाही हे तुमच्या सारख्या लोकांच्या लक्षात येत नसेल तर हा पुरंदर आहे. त्यामुळे माझी तुम्हाला अजूनही विनंती आहे, अजून दोन दिवस शिल्लक आहेत, वेळ गेलेली नाही, माझे चुकले म्हणून जाहीर करा आणि माझ्यासोबत या, आपण एकत्रित काम करू, अन्यथा तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांना दिला आहे.
सासवड येथील पालखी तळावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारानिमित्त जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी राजस्थानच्या माजी शिक्षणमंत्री नदीम, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, विजयराव कोलते, शंकर हरपळे, सुदाम इंगळे, दिलीप बारभाई, माणिकराव झेंडे आदी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : सचिन पायलट यांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, आता तुमची…
‘किती वेळ गुंजवणी, गुंजवणी करीत बसणार?’
निवडणुकीत कोणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे. मात्र निवडून आल्यावर लोकांसाठी काम करायचे असते. काही लोक मुंबईमध्ये राहतात. पाच वर्षांनी गावाला जायचे. मुख्यमंत्र्यांचे भाषण ठेवायचे ते येतात अणि त्यांचे कौतुक करून जातात, अशी टिप्पणी करतानाच पुरंदर उपसा, जेजुरी एमआयडीसीमध्ये त्यांचा सहभाग किती आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आज देशाची, राज्याची सत्ता त्यांच्या हातात असताना किती वेळ गुंजवणी, गुंजवणी करीत बसणार? अशा शब्दात महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यावर जोरदार शरद पवार यांनी हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले की, मोदी सरकारला देशाची राज्यघटना बदलायची असल्याने ४०० खासदारांची गरज होती. राज्यघटना धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानेच त्यांना विरोध केला. त्यांना गरिबांचा गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत ठेवायचा आणि देशाची सत्ता मूठभर लोकांच्या हातात ठेवायचा हा विचार होता म्हणून आम्ही विरोध केला.