महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; चिमणकर बंधू दोषमुक्त
मुंबई : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी चिमणकर बंधूंना मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने कृष्णा चिमणकर, चिमणकर आणि प्रसन्न चिमणकर यांना दोषमुक्त केले. याच चिमणकर बंधूंनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम केले आहे. प्रशांत
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी भुजबळ काही काळ तुरुंगातही जाऊन आले. नंतर महायुतीसोबत गेल्यानंतर छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने भुजबळांना क्लीनचिट दिली. याच प्रकरणात चिमणकर बंधूंना आता दोषमुक्त करण्यात आले आहे.
दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी, तसेच मुंबईत मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने कंत्राट दिले. या कामाची कोणतीही निविदाप्रक्रिया राबवण्यात आली नाही. कालांतराने संबंधित कंपनीने इतर विकासक कंपनीसोबत करारनामा करत विकासाचे हक्क विकले.
सरकारच्या निकषांप्रमाणे कंत्राटदार राज्य आस्थापनाला 20 टक्के नफा अपेक्षित असताना पहिल्या विकासकाला 80 टक्के नफा मिळाल्याचा आरोप केला गेला. यामध्ये आस्थापनाने 190 कोटी रुपयांचा नफा कमावला. त्यातील 13 कोटी 50 लाख रुपये आस्थापनाने भुजबळ कुटुंबीयांना दिले, असा आरोप भ्रष्टाचारविरोधी पथकाने केला होता.
ईडीने केली होती कारवाई
सन 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता याप्रकरणी विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती.
यापूर्वी सीएला केलं होतं दोषमुक्त
महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरु होती. यामध्ये कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांचे नाव आले होते. मंत्री भुजबळ यांचे सनदी लेखापाल (सीए) श्याम राधाकृष्ण मालपाणी यांना महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून उच्च न्यायालयाने यापूर्वीच दोषमुक्त केले होते. त्यानंतर आता चिमणकर बंधूंना दोषमुक्त करण्यात आले आहे.