विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केले जाते. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी किंवा पचनाची समस्या कमी करण्यासाठी लिंबू पाण्यात मीठ आणि जिरं मिक्स करून प्यायले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. याशिवाय पचन सुधारते, त्वचेचा रंग सुधारतो आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. पण चुकीच्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केल्यास आतड्यांसंबंधित गंभीर समस्या उद्भवत शकतात. जाणून घ्या लिंबासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
'या' पदार्थांमध्ये चुकूनही मिक्स करून नका लिंबू
लिंबूमधील आम्ल दूध किंवा दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे विघटन करून टाकते. ज्यामुळे अपचन, पोट खराब होणे, पोटात वेदना होणे किंवा आतड्यांसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
कॅल्शियम युक्त अंडी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. पण काहींना उकडलेल्या अंड्यांवर लिंबाचा रस टाकून खाण्याची सवय असते. असे केल्यामुळे शरीराला ऍलर्जी होऊ शकते.
आंबट फळांसोबत चुकूनही लिंबाचे सेवन करू नये. यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. फळांचे सॅलड बनवल्यानंतर त्यासोबत लिंबाचे सेवन करू नये.
व्हिनेगर आणि टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ल्पित्त असते. त्यामुळे या पदार्थांवर लिंबू टाकून सेवन करू नये. असे केल्यास पोटात जळजळ किंवा छातीत जळजळ इत्यादी समस्या वाढू शकतात.
मसालेदार पदार्थांमध्ये लिंबू घातल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे गॅस, छातीत जळजळ आणि अल्सर होण्याची जास्त शक्यता असते.