Breaking News अपडेट
17 Sep 2025 10:05 AM (IST)
सातारा: सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार भर दिवस करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
17 Sep 2025 10:00 AM (IST)
ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्स वर पंतप्रधान मोदींसोबतचा एक भावनिक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला. नागार्जुन यांनी २०१४ मध्ये गांधीनगर येथे पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण देखीलस शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागार्जुन यांनी पंतप्रधान मोदींबद्दल त्यांचे मनापासून कौतुक व्यक्त केले आणि त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
17 Sep 2025 09:55 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात राजधानी दिल्लीमध्ये या दिवसाचे वेगळेच महत्त्व आहे. कारण, दिल्ली सरकारने “सेवा पंधरवडा” कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या विशेष उपक्रमांतर्गत तब्बल ७५ नवीन योजना राबवल्या जाणार असून, त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये १५ मोठ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
17 Sep 2025 09:50 AM (IST)
भारतात आज 17 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,194 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,261 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,396 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,610 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,940 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,960 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 134.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,34,100 रुपये आहे.
17 Sep 2025 09:46 AM (IST)
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत, बाजारातील तज्ञ चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पॉन्डी ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड, रॅलिस इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान झिंक लिमिटेड, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC), हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी लिमिटेड, टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.
17 Sep 2025 09:40 AM (IST)
हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि ऑस्कर विजेते दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याने जगावर अमिट छाप सोडणारे रेडफोर्ड यांचे युटामधील सनडान्स येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले, जिथे त्यांनी त्यांचे शेवटचे दिवस कुटुंब आणि प्रियजनांच्या सान्निध्यात घालवले. वृत्तानुसार, रॉबर्ट यांचे झोपेत निधन झाले असल्याचे समजले आहे.
17 Sep 2025 09:20 AM (IST)
शिरवळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शिरवळमध्ये धक्कादायक घटना घडली. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रियाज उर्फ मन्या इकबाल शेख (वय ४०) याच्यावर भर रस्त्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला असून, हल्लेखोर फरार झाले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
17 Sep 2025 09:08 AM (IST)
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे. सततचा पाऊस असल्याने चुलीत जाळायला लाकूड मिळालं नाही. म्हणून गॅस सिलेंडरची पैसे खर्च केले. कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चले म्हणून मुलानेच बापाची निर्घृणपणे हत्या केली.
Marathi Breaking News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. मध्य प्रदेशात हा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा एक विशेष कार्यक्रम आहे, कारण पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा राज्याच्या भूमीवर त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यापूर्वी, 17 सप्टेंबर 2022 रोजी, त्यांच्या 72 व्या वाढदिवशी, त्यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते सोडून प्रोजेक्ट चित्ता सुरू केला.
पंतप्रधान मोदी धार जिल्ह्यातील भैनसोला गावात आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते टेक्सटाईल पार्क, स्वस्थ नारी, सशक्त कुटुंब आणि पोषण अभियान आणि आदि सेवा पर्व यासह राज्याला अनेक महत्त्वाच्या भेटवस्तू देतील. या दरम्यान, राज्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव देखील उपस्थित राहणार आहेत.
यादरम्यान, पंतप्रधान महिला, किशोरवयीन आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण बळकट करण्यासाठी मोहिमेचे उद्घाटन करतील. ही मोहीम आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि महिला आणि बाल विकास विभाग संयुक्तपणे चालवेल. या अंतर्गत, आरोग्य शिबिरे आणि संस्थांद्वारे प्रतिबंधात्मक, प्रचारात्मक आणि उपचारात्मक सेवा प्रदान केल्या जातील.