Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 05:35 PM
आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

Follow Us
Follow Us:
  • आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच
  • परिसरात खळबळ
  • नागरिकांनी व्यक्त केला संताप
पिंपरी : महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. गरुडस्तंभापासून भक्त पुंडलिक मंदिर घाटापर्यंत अनेक मासे मृतावस्थेत तरंगताना दिसले, तर काही मासे नदीच्या पायऱ्यांवरही पडलेले आढळले. ही परिस्थिती पाहता नदीतील प्रदूषणाची भीषणता उघड झाली आहे.

सांडपाणी आणि रासायनिक उत्सर्जन कारणीभूत

स्थानिक रहिवासी आणि नागरिकांनी अनेक दिवसांपासून नदीतील वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठच्या गावांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडले जात आहे. तसेच, काही उद्योगांमधून होणारे रासायनिक पाण्याचे निःसारण देखील नदीत मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. या वाढत्या प्रदूषणानेच माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंद्रायणीतील वाढते प्रदूषण हाच माशांच्या मृत्यूचा मुख्य कारणीभूत घटक आहे. परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. मग यासाठी जबाबदार कोण? असे प्रश्न ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत.

भाविकांच्या आरोग्याला गंभीर धोका

दररोज हजारो भाविक याच इंद्रायणी नदीत स्नान आणि आचमन करतात. अशा वेळी नदीतील ही विषारी परिस्थिती भाविकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रात्री मृत माशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले असून, नागरिकांनी या गंभीर प्रदूषणाबद्दल तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Citizens angered after dead fish were found in the indrayani river in alandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • alandi
  • CM Devedra Fadnavis
  • Indrayani River

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.