Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट

नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगर पंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यासह राज्यभर अनेक ठिकाणी घडलेल्या गैरप्रकारांमुळे निवडणूक व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 02:41 PM
निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत
  • वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट
  • आगामी निवडणुकांबाबत चिंता
यवत : नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगर पंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यासह राज्यभर अनेक ठिकाणी घडलेल्या गैरप्रकारांमुळे निवडणूक व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे प्रकार उघड होत असल्याने सामान्य मतदार, कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रात प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. मतदानादरम्यान बोगस मतदान, बोगस मतदार याद्या, मतदारांवर दबाव, दहशत, मारहाण, गुंडगिरी, पैसेवाटप अशी गंभीर प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघडकीस आली आहेत. प्रसारमाध्यमांमधून या घटना जनतेसमोर आल्याने कार्यकर्त्यांपासून सामान्यजनांपर्यंत सर्वांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असून, विशेष बाब म्हणजे सत्ताधारी गटाकडूनच असे प्रकार मोठ्या प्रमाणात केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे या प्रकरणांची दखल घेतली जाईल का? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.

निकाल जाहीर करण्यात विलंब

३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा असूनदेखील, अचानक निकाल जाहीर करणे थांबवून आता ते २१ डिसेंबरला घोषित केले जातील, अशी माहिती देण्यात आली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.. निवडणूक आयोग आणि न्यायालयाचे निर्णय वारंवार बदलत असल्याने उमेदवार, त्यांचे पॅनलप्रमुख, पक्षनेते तसेच मतदार या सर्वांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

यापूर्वीही जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि सहकार क्षेत्रातील निवडणुका दीर्घ काळ लांबल्या होत्या. सरकारने वेळेत निवडणुका न घेण्याची जबाबदारी टाळल्याचा आरोपही होत आहे. अखेर निवडणुका झाल्या तरी निकाल रोखून ठेवण्यात आल्याने प्रश्न चिघळला आहे.

आगामी निवडणुकांबाबत चिंता

आता पुढे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. मात्र सद्यस्थिती पाहता या निवडणुका पारदर्शक, प्रामाणिक आणि दहशतीविना होतील का? असा गंभीर सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

जबाबदारी कोणाावर?

मतदानादिवशी घडलेले प्रकार माध्यमांमधून स्पष्टपणे समोर आले आहेत. निवडणूक आयोग, प्रशासन, पोलिस विभाग, राजकीय पक्ष तसेच शासन यंत्रणा या सर्वांनीच या घटनांकडे पुरेसं गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व प्रकार लोकशाही प्रक्रियेला मोठा धक्का देणारे असून “ही लोकशाही की अराजकशाही?” असा सवाल नागरिकांमधून ऐकू येत आहे. निवडणूक ही लोकशाहीची पायरी आहे. पण जर त्याच प्रक्रियेवर जनतेचा विश्वास उडू लागला तर लोकशाहीचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Citizens are upset due to the increase in irregularities during the election process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Election Commision
  • Election News

संबंधित बातम्या

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी
1

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
2

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला
3

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.