
102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला १४६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती १०९६ अर्ज वैध ठरले. त्यानंतर ५३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर अखेर ५६४ उमेदवार अंतिम लढतीत उतरले आहेत. शहरातील २६ प्रभागांमध्ये ३५३ इमारतींमध्ये १०९१ मतदान केंद्र (बूथ) उभारण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वाधिक २१ मतदान केंद्रे असून, त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ९ मध्ये १८ केंद्रे आहेत.
तसेच प्रभाग क्रमांक ८, १३, २२ आणि २४ मध्येही मतदान केंद्रांची संख्या तुलनेने अधिक आहे. तर प्रभाग क्रमांक १ आणि २५ मध्ये सर्वात कमी म्हणजे ९ मतदान केंद्रे असून, प्रभाग क्रमांक २, ११ आणि २६ मध्येही कमी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पक्षीय लढत चुरशीची
या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक व विचारधारात्मक पक्ष मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत.
मतदारांचा कौल कोणाला?
प्रभागनिहाय चुरशीची लढत, विविध पक्षांची ताकद आणि अपक्षांची संख्या पाहता ही निवडणूक अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत. आता ९ लाखांहून अधिक मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात सकाळच्या वेळी संथ गतीने मतदान; साडेअकरापर्यंत 14.92 टक्क्यांची नोंद
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . बुधवारी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन निवडणूक प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आले आहेत .