कल्याण : डोंबिवली पासपोर्ट कार्यालयात (Dombivali Passport Office) नागरिकांना शूज चप्पल कार्यालयाबाहेर काढण्याची (Remove Footwear Outside) सक्ती करणारे (Compulsion) व स्वतः बूट चप्पल घालून कार्यालयात बसणारे कर्मचारी (Officials With Footwear in Office) यांच्यावर नागरिकांचा अवमान करत असल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी (Demand) भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड (State General Secretary of BJP Bhatke Vimukt Aghadi Shivaji Awhad) यांनी केली आहे.
डोंबिवली पासपोर्ट कार्यालय येथे तेथील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा प्रकार भाजप नेते शिवाजी आव्हाड यांनी उघडकीस आणला आहे. आव्हाड हे या कार्यालयात कामानिमित्त गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांना प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
[read_also content=”‘सिक्सर ऑन पब्लिक डिमांड’ सलीम दुर्रानी यांचे कर्करोगाने निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/sports/former-cricketer-salim-durani-passed-away-indian-cricketer-death-due-to-cancer-at-the-age-of-88-nrvb-380398.html”]
येथील कर्मचारी सरसकट सर्वच नागरिकांना शूज,चप्पल कार्यालय बाहेर काढण्याची सक्ती करतात. मात्र स्वतः येथील कर्मचारी कार्यालयात शूज व चप्पल घालून बसतात. नागरिकांनाच शूज चप्पल बाहेर काढण्याची सक्ती का? असा सवाल शिवाजी आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांशी भेदभाव करत सर्वसामान्य नागरिकांचा अवमान करणाऱ्या या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शिवाजी आव्हाड यांनी म्हटले आहे.
स्वच्छतेच्या कारणास्तव जर चप्पल शूज बाहेर काढण्याची पद्धत असेल तर स्वतः कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्वतःची चप्पल आणि शूज हे बाहेर काढायला हवेत असे शिवाजी आव्हाड यांनी म्हटले असून या उद्धट व मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाईसाठी आपण संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही भाजप नेते शिवाजी आव्हाड यांनी सांगितले आहे.
[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : २ ते ८ एप्रिल २०२३, कन्या राशीचे वैवाहिक जीवन सुखकर होणार आहे; वाचा तुमच्यासाठी हा आठवडा कसा जाईल https://www.navarashtra.com/lifestyle/weekly-horoscope-2-to-8-april-2023-married-life-of-virgo-will-be-happy-read-saptahik-rashibhavishya-this-week-in-marathi-nrvb-380305.html”]