Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने दिलेला ‘तो’ शब्द पाळला; होणार मोठा फायदा !

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, तसा ‘जीआर’ निघाला नव्हता. अखेर शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने पूर्णमाफ केल्याचा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला आहे. गेल्या १४ वर्षांपासूनचा शास्तीकराचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2023 | 06:28 PM
Shinde-Fadnavis

Shinde-Fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) केली होती. त्याला पूर्णत्व मिळाले आहे. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र, तसा ‘जीआर’ निघाला नव्हता. अखेर शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने पूर्णमाफ केल्याचा ‘जीआर’ राज्य सरकारने काढला आहे. गेल्या १४ वर्षांपासूनचा शास्तीकराचा प्रश्न आता कायमस्वरुपी सुटला आहे.

भारतीय जनता पार्टीचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीसाठी राज्य सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केला. अखेर पिंपरी-चिंचवडकरांच्या लढ्याला यश मिळाले. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफीची घोषणा केली होती. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली होती. त्यामुळे शहरातील सुमारे १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.

निवडणुकीपूर्वीची घोषणा खरी ठरली…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत शास्तीकराचा ‘जीआर’ लवकरच काढण्यात येईल, अशी घोषणा केली होती. गुरुवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने ‘जीआर’ प्रसिद्ध केला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीवर सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या १४ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकराचा बोजा लादण्यात आला होता. त्यामुळे सुमारे १ लाख मिळकतधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शास्तीकरण पूर्ण माफीची घोषणा झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. शास्तीकर माफीच्या लढ्यामध्ये मोठे योगदान देणारे दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आपआपल्या परीने पुढाकार घेतला. त्या सर्वांचे धन्यवाद देतो.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजप, पिंपरी-चिंचवड

Web Title: Citizens of pimpri chinchwad punishable gr has finally arrived decision of shinde fadnavis government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2023 | 06:28 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Government
  • Pimpri
  • Pimpri Chinchwad
  • Shinde-Fadnavis government

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते घातक; कारण…
2

तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते घातक; कारण…

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
3

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
4

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.