• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Cloudy Weather Has Destroyed Vineyards In Tasgaon Taluka

ढगाळ हवामानाने द्राक्षबागा उद्ध्वस्त; तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात

तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 07, 2025 | 12:12 PM
ढगाळ हवामानाने द्राक्षबागा उद्ध्वस्त; तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ढगाळ हवामानाने द्राक्षबागा उद्ध्वस्त
  • हजारो एकरांवरील द्राक्षबागा रोगट अवस्थेत
  • तासगाव तालुक्यातील शेतकरी संकटात
तासगाव/ मिलिंद पोळ : तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे. तालुक्यातील बहुतेक द्राक्षबागांवर डाऊनी मिल्ड्यू, करपा आणि घडकुजी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असून, हजारो एकरांवरील द्राक्षबागा रोगट अवस्थेत गेल्या आहेत.

तासगाव तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, बोरगाव, मांजर्डे, वायफळे परिसरातील द्राक्ष उत्पादकांना डाऊनीचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलोऱ्यात आणि डिपिंग अवस्थेतील घडांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग वाढला असून, घड कुजण्याची प्रक्रिया सुरू आहे. घडांना पाणी लागले की एका दिवसात कुज सुरू होते आणि संपूर्ण फुलोरा नष्ट होतो, असे काही अनुभवी द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.

डाऊनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बाजारातील औषधांवर हजारो रुपये खर्च करत आहेत. मात्र, ही औषधे परिणामकारक ठरत नाहीत. काही औषधांचे दर किलोमागे किंवा लिटरमागे १,००० ते ७,००० पर्यंत असून, दिवसातून दोन फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. औषधे फवारल्यावर दोन दिवस ठीक वाटतं, पण नंतर पुन्हा रोग दिसू लागतो. बाग वाचवायची की कर्ज फेडायचं, हा प्रश्न उभा राहिला आहे, असे एका बागायतदाराने सांगितले.

हवामानातील बदल आणि सततचे ढगाळ वातावरण यामुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. पहाटे पडणारे दाट धुके रोगाच्या बीजाणूंना पोषक ठरत आहे. पुढील काही दिवसांत हवामान कोरडे झाले नाही, तर द्राक्ष उत्पादनाचा संपूर्ण हंगाम हातातून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी मोठ्या खर्चाने द्राक्षबागा उभारणारे शेतकरी या नैसर्गिक आपत्तीसमोर हतबल झाले आहेत. डाऊनी व घडकुजीने बागांची पाने, घड आणि फुलोरे नष्ट होत असून, हंगामातील गुंतवणूक वाया जाण्याची भीती आहे. शासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर हजारो शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी भावना संपूर्ण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.

दर हंगामात लाखो रुपये खर्च करून बाग फुलवतो. या वर्षी बाग जोमात आली होती, पण आता डाऊनी आणि घडकुजीने सगळं उद्ध्वस्त केलं. औषधं फवारली तरी काही उपयोग नाही. हवामान आणि सुमार औषधांमुळे बाग हातातून निसटतेय. सरकारने आमचं ऐकून मदत केली पाहिजे. -नितीन तारळेकर, द्राक्षबागायतदार, सावळज

औषध निरीक्षकांकडून तपासणी करावी

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आरोप म्हणजे बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर कोणतेही शासन नियंत्रण नाही. काही कंपन्यांची औषधे नावालाच असून, ती परिणामकारक ठरत नाहीत. हजारो रुपये खर्च करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने द्राक्षबागांवरील रोगांचा सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, बाजारातील कीडनाशकांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध निरीक्षकांकडून तपासणी मोहिम राबवावी, अशीही मागणी होत आहे.

बाजारात अनेक कंपन्यांची औषधे उपलब्ध आहेत, पण दर्जा सगळ्यांचा सारखा नसतो. काही शेतकरी कमी दराच्या औषधांकडे वळतात आणि परिणामकारक औषधे टाळतात. तरीदेखील काही कंपन्यांच्या औषधांचा परिणाम कमी झाला आहे, हे खरं आहे. हवामानातील बदलामुळे रोग नियंत्रण कठीण झालंय. -सिद्धनाथ जाधव कृषी औषध विक्रेता, सावळज (तासगाव.)

सध्याच्या हवामानात द्राक्षबागांना अत्यंत नियंत्रित सिंचन, योग्य वेळी फवारणी आणि जैविक औषधांचा समतोल वापर गरजेचा आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा अतिरेक करू नये. योग्य वेळी तापमान वाढले, तर डाऊनीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. -सुधीर निकम, द्राक्ष शेती सल्लागार, डोंगरसोनी (तासगाव)

Web Title: Cloudy weather has destroyed vineyards in tasgaon taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • Farmers
  • Tasgaon
  • Weather

संबंधित बातम्या

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा
1

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Maharashtra Budget Live: ‘बळीराजा’ बजेटच्या केंद्रस्थानी; फडणवीसांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
2

Maharashtra Budget Live: ‘बळीराजा’ बजेटच्या केंद्रस्थानी; फडणवीसांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती
3

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर
4

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dedication…अर्जुन तेंडुलकरमध्ये दिसली सचिन तेंडुलकर छवी! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परतला क्रिकेटच्या मैदानावर

Dedication…अर्जुन तेंडुलकरमध्ये दिसली सचिन तेंडुलकर छवी! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परतला क्रिकेटच्या मैदानावर

Mar 07, 2026 | 09:35 AM
Shani Dosh: तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Shani Dosh: तुमच्या कुंडलीमध्ये शनि दोष आहे का? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Mar 07, 2026 | 09:31 AM
दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का? शिकार पाहताच तुटून पडला अन् अनोख्या सापाचा Video Viral

Mar 07, 2026 | 09:29 AM
Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

Mar 07, 2026 | 09:14 AM
मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना

मला वाचवा…भारतात अडकलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूने क्रिस्टियानो रोनाल्डोकडे केली मदतीची याचना

Mar 07, 2026 | 09:14 AM
ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’? ओव्हल ऑफिसमधील ‘त्या’ प्रार्थनेने जगात खळबळ, नेमकं काय घडलं?

ट्रम्प यांचा इराणविरुद्ध ‘धर्मयुद्ध प्लॅन’? ओव्हल ऑफिसमधील ‘त्या’ प्रार्थनेने जगात खळबळ, नेमकं काय घडलं?

Mar 07, 2026 | 09:05 AM
zodiac sign: बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

zodiac sign: बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Mar 07, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.