Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagwane: “जे कठोरात कठोर…”; CM देवेंद्र फडणवीसांचा वैष्णवीच्या कुटुंबियांना शब्द

वैष्णवीच्या १० महिन्यांच्या मुलाला तिच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे

  • By तेजस भागवत
Updated On: May 24, 2025 | 06:41 PM
Vaishnavi Hagwane: “जे कठोरात कठोर…”; CM देवेंद्र फडणवीसांचा वैष्णवीच्या कुटुंबियांना शब्द
Follow Us
Follow Us:

पिंपरी: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भुकूम येथे हगवणे यांचा सासरमध्ये राहत्या घरी मृतदेह आढळला होता. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी घरात गळफास घेतात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्यानंतर सासरच्यांवर मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली असून प्रत्येकाने वैष्णवीला न्याय देण्याची मागणी केलीय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉल करत कस्पटे कुटुंबियांशी संवाद साधला.

आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत, काळजी करू नका. आपल्यावर कठीण परिस्थिती आली आहे. पण सरकार पोलीस प्रशासन सर्व पाठीशी आहे. अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. जे कठोरात कठोर करता येईल ते करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीच्या वडिलांना दिला आहे. पुण्यामध्ये अनिल कस्पटे यांच्या कुटुंबियांची भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये असलेल्या फडणवीसांशी व्हिडीओ कॉल करत कस्पटे यांचे बोलणे करून दिले आहे.

वैष्णवीच्या १० महिन्यांच्या मुलाला तिच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे आणि योग्य कारवाईसाठी पाठपुरावा करत आहे. पुणे बार असोसिएशनला वैष्णवीच्या वडिलांनी आरोपींचे वकीलपत्र न घेण्याबाबत पत्र दिले आहे.

Vaishnavi Hagavane Case: वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचीही हेळसांड…; निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे यांना अटक केली होती. मात्र फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर वैष्णवीला न्याय मिळावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

करुणा मुंडेंची चाकणकरांवर सडकून टीका

वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोग आणि अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी केली जात आहे. आता यावर करुणा मुंडे यांनी देखील भाष्य केले आहे.

महिला आयोगाकडे शेकडो तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीमधील किती महिलांना आतापर्यंत न्याय देण्यात आला? असा प्रश्न करुणा मुंडे शर्मा यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकर यांचे काम पक्षासाठी फिरणे नसून, महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतेय त्याचे निवारण करणे हे आहे, असा सणसणीत टोला करुणा मुंडे शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.

Vaishnavi Hagwane: “त्या सुंदर दिसतात म्हणून…; वैष्णवी मृत्यू प्रकरणात करुणा मुंडेंची चाकणकरांवर सडकून टीका

महाराष्ट्रात पूजा चव्हाण, वैष्णवी प्रत्येक घरी आहेत. महिला आयोगाकडे तक्रारी करून देखील न्याय मिळालेल्या दोन महिला करुणा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांना न्याय दिला नाही तर ३५ हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis conversation with kaspte family vaishnavi hagwane death case crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • crime news
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
1

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
3

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
4

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.