Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळे – नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार – मुख्यमंत्री फडणवीस

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 12, 2026 | 08:11 PM
Dhule-Nandurbar, Devendra Fadnavis, Maharashtra Government, Dhule News, Nandurbar news,

Dhule-Nandurbar, Devendra Fadnavis, Maharashtra Government, Dhule News, Nandurbar news,

Follow Us
Follow Us:

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब उपाख्य चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य‘ या जीवनचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार अमरीशभाई पटेल, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, सौरभ शुक्ला, विनय सहस्रबुद्धे, कुणाल पाटील, माजी आमदार जयंत पाटील, चित्रा वाघ उपस्थित होते.

राज्याच्या नव्या विकास आराखड्यात धुळे व नंदुरबारला महत्वाचे स्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्याने अनेक दशकांपासून महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. या भागातील मानवी संसाधने, उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील क्षमता लक्षात घेऊन राज्याच्या नव्या विकास आराखड्यात या दोन्ही जिल्ह्यांना महत्वाचे स्थान दिले जाणार आहे.

अण्णासाहेबांचे कार्य म्हणजे परिवर्तनाचा इतिहास

दिवंगत अण्णासाहेब चुडामण पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आर्थिक संकटामुळे गिरणीत नोकरी स्वीकारलेल्या अण्णासाहेबांनी अन्यायाविरोधात लढा उभारला. स्वातंत्र्यलढ्यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आणि ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेत दोन वर्षांचा कारावास भोगला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि पंडित नेहरू यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांना स्वतःला शिक्षण घेता आले नाही, मात्र समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली. शाळा, महाविद्यालये, तसेच पुढे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे जाळे उभे राहिले. अण्णासाहेबांनी रोवलेले हे बीज पुढील पिढ्यांनी जोपासत मोठा विस्तार घडवून आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

संपूर्ण कर्जमाफी करा ! शक्तिपीठ महामार्ग रद्द करा ! धाराशिवमध्ये कॉंग्रेसचे आंदोलन, कर्जमाफीच्या जीआरची केली होळी

लोकांच्या मनावर राज्य करणारे ‘अजिंक्य’ नेतृत्व

अण्णासाहेब सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले. मात्र ‘अजिंक्य’ ही उपाधी त्यांना केवळ निवडणूक विजयांमुळे मिळालेली नाही. शिक्षण, सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य, जोडलेली माणसे आणि लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हेच त्यांच्या अजिंक्यत्वाचे खरे कारण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

चांगल्या कार्याचे दस्तावेजीकरण काळाची गरज

समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘अजिंक्य’ हा चरित्रग्रंथ केवळ अण्णासाहेबांच्या जीवनाचा आलेख नसून धुळे जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासाचाही महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे, असे त्यांनी नमूद केले.

धुळे ही ‘नररत्नांची खाण’

धुळे जिल्ह्याने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी अनेक व्यक्तिमत्वे महाराष्ट्राला दिली आहेत. या जिल्ह्यातील क्षमता आणि कर्तृत्व पाहता हा जिल्हा ‘नररत्नांची खाण’ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आमदार अमरीश पटेल यांच्यासारख्या उद्योजकांनी ग्रामीण भागात उभे केलेले विकास मॉडेलही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपुरात रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन’, २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी

Web Title: Cm devendra fadnavis says dhule nandurbar to be made the states new growth engine for development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • dhule news
  • Nandurbar News

संबंधित बातम्या

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
1

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
2

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही
3

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
4

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.