
'देवाभाऊ' ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे 'चाणक्य'! "महापौर हिंदू अन्..."; CM फडणवीसांनी ठणकावलं
मुंबई अखेर महायुतीला मिळाले बहुमत
ठाकरेंनी गमावला 25 वर्षांचा गड
मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी 25 पालिकेत महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. सकाळपासून बहुमत असणारी महायुतीचे आकडे मुंबईत काही कालावधीसाठी खाली आले होते. मात्र अखेर महायुतीने 116 जागा मिळवत मुंबईत सत्ता प्राप्त केली आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे यांनी आपला 25 वर्षांचा गड गमावला आहे. दरम्यान याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान अभूतपूर्व विजयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसह महाराष्ट्रामध्ये भाजपाला आणि महायुतीला जनतेने अभूतपूर्व कौल दिला आहे. विकासाच्या अजेंड्याला जनतेने विश्वास दर्शवला आहे. अभूतपूर्व प्रकारचे बहुमत असे आज आम्हाला मिळाले आहे. मी राज्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्णविराम आहे. आम्ही आधीच सांगितले होते महापौर महायुतीचा, मराठी आणि हिंदूच होणार. महाराष्ट्रामध्ये ब्रॅंड एकच. तो म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही स्वतःला ब्रॅंड समजणे अयोग्य आहे. विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे. विजयाचा उन्माद कोणीच करू नये. इतक्या सुंदर विजयाचा आनंद साजरा करा. फक्त उन्माद करू नका. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था झाली नसती. विजयाचे श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला, यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे.”
“पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या जनतेचे आभार मानतो. आमच्या विकासाच्या अजेंड्याला छप्पर फाडके आशीर्वाद दिलेला आहे. शंभर टक्के उद्या ईव्हीएम, पाडू मशीन, शाई असे मुद्दे उद्यापासून चर्चेत येणार आहेत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. आज महायुतीला आणि भाजपला महाविजय मिळाला आहे. 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजप व महायुतीची सत्ता येते आहे. मुंबई महापालिकेत देखील निश्चित बहुमत महायुतीलाच मिळणार आहे. आपण या निवडणुकीत विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. या विकासाच्या मुद्द्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.”
महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राचा विश्वास हा पंतप्रधान मोदींवरच आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढलो त्याला जनतेने प्रतिसाद दिला. पुढेही आपला अजेंडा विकासाचाच असणार आहे. आमचा कार्याचा आत्मा आहे, विचारांचा आत्मा आहे, हा हिंदुत्ववाद आहे. हिंदुत्ववादी आहोतच, याचा आम्हाला अभिमान आहे. आज याच्या माध्यमातून हिंदुत्व आणि विकास याला वेगळे करता येणार नाही. आम्ही संकुचित हिंदुत्ववादी नाही. एक व्यापक असे जनसमर्थन आपल्याला मिळालेले आहे.”