Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Mumbai News: दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 09:46 PM
“जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
Follow Us
Follow Us:

चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणुसकीचे शिल्पकार- एकनाथ शिंदे
चैत्यभूमी बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र – सुनेत्रा  पवार

मुंबई:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे.   संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

“… प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार”; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला.  १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

DR. Babasaheb Ambedkar : शहरात जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर; महामानवाच्या संघर्षमय गाथा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Cm fadnavis said thoughts of bharat ratna dr babasaheb ambedkar are significant global economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Maharashtra Governor

संबंधित बातम्या

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 
1

Devendra Fadanvis On Vidyand Bapat : “बापटांसारखी मराठी बोलायला मला ट्यूशन घ्यावी लागेल” 

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?
2

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश
3

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
4

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.