Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना 'अराजकवादी' म्हणण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत माफीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 10:20 PM
Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Follow Us
Follow Us:

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केले आहे. विद्यार्थी आंदोलानाला ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ म्हंटल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आता जोरदार टीका होत असून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनीही यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

वर्ष गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच “धर्मेंद्र प्रधान यांच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांवर असे शेलके शब्द वापरण्याची तुमची हिंमत कशी झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

‘विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी,’ विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड ?

वर्षा गायकवाड आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हणाल्या, “पेपरफुटी, भरतीप्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि उध्वस्त होणाऱ्या भविष्याविरोधात जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या देशातील तरुणांना ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ ठरवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करते!”

“तसेच सदाभाऊ खोत यांनी तर लाचारीची हद्द पार करत हक्कासाठी लढणाऱ्या याच सुशिक्षित तरुणांना ‘दहशतवादी’ घोषित करून टाकले. सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांवर असे शेलके शब्द वापरण्याची तुमची हिंमत कशी झाली?”

पेपरफुटी, भरतीप्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि उध्वस्त होणाऱ्या भविष्याविरोधात जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या देशातील तरुणांना ‘अराजकवादी’ आणि ‘फेसलेस’ ठरवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेजबाबदार विधानाचा मी तीव्र शब्दांत निषेध करते!
तसेच सदाभाऊ खोत यांनी… pic.twitter.com/QcfKk1A7e1
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 21, 2026


मुख्यमंत्री महोदय, तुमचे हे दावे आणि आमचे सडेतोड सवाल:
“आंदोलनाआडून राजकीय पोळी भाजली जातेय?” — “५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आयुष्य पेपरफुटीमुळे उध्वस्त झाले, तेव्हा कुठे गेला होता तुमचा हा राजकीय ताळेबंद? स्वतःचे अपयश लपवण्यासाठी प्रत्येक आंदोलनाला ‘राजकीय’ ठरवणे हा महायुतीचा सवयीचा धंदा झाला आहे!”

“आंदोलनात अराजकता पसरवणारे घुसलेत?” — “ज्या तरुणांनी दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षा दिल्या, ते आज रस्त्यावर न्यायासाठी भीक मागत आहेत. त्यांना ‘अराजकवादी’ ठरवून त्यांच्या पाठीवर पोलिसांच्या लाठ्या चालवणे, हा तुमचा कसला न्याय?”

“पोलिसांचे नियंत्रण नसते तर भयंकर घडले असते?” — “अहो, लाठीमार आणि अश्रुधूर सोडून तुम्ही विद्यार्थ्यांचे आवाज दाबू शकत नाही! नियंत्रण पोलिसांचे नाही, तर तुमच्या भ्रष्ट व्यवस्थेवरील सुटले आहे!”

“जालियनवाला बागची आठवण झाली”; विद्यार्थी लाठीचार्जनंतर संसद परिसरात चंद्रशेखर आझाद यांचे धरणे आंदोलन

“ज्या तरुणांच्या जिवावर तुम्ही सत्तेच्या खुर्च्यांवर बसला आहात, त्यांनाच ‘दहशतवादी’ आणि ‘अराजकवादी’ ठरवून तुम्ही स्वतःच्या विनाशाची नांदी लिहीत आहात.”

“तरुणांच्या संतापाची ही आग कोणत्याही लाठीमाराने किंवा दबावाने विझणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांनी देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे!”

Web Title: Varsha gaikwad slams devendra fadnavis over student protest remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • CJP Protest
  • CM Devendra Fadnavis
  • Sadabhau Khot
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
2

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
3

दुष्काळ आणि अल निनोच्या संकटात शेतकरी होरपळला; ‘विशेष पॅकेज जाहीर करा’, धीरज देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
4

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.