पुणे : फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे यांच्यातर्फे व इलाईट स्पोर्ट्स इव्हेंट्स यांच्या संलग्नतेने आयोजित श्रीगुरु गोबिंद सिंग चॅलेंजर्स करंडक फुटबॉल स्पर्धेत खुल्या गटात सीएमएस फाल्कन ‘अ’ संघाने विजेतेपद संपादन केले., तर 40 वर्षांवरील गटात आकतसुखी संघाने विजेतपद पटकावले.
सीएमएस फाल्कन अ संघाचा विजय
खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या हॉटफुट फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत खुल्या गटात सीएमएस फाल्कन अ संघाने फातिमा इलेव्हन संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत सीएमएस फाल्कन अ संघाकडून शिबू सनी(45मि.)याने. तर, फातिमा इलेव्हनकडून सूरज पेरियार(24मि.)यांनी गोल केले. त्यामुळे सामन्यात 1-1अशी बरोबरी निर्माण झाली.
टायब्रेकर पद्धतीचा अवलंब
सामन्यात बरोबरी निर्माण झाल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये सीएमएस फाल्कन अकडून जेफ्री डिसुझा, फवाद धुंडवरे, विकी राजपूत, अश्विन विजयन यांनी गोल केले. तर, फातिमा इलेव्हनकडून सूरज पेरियारला गोल मारण्यात अपयश आले.
40 वर्षांवरील गटात अंतिम लढतीत आकतसुखी संघाने पुणे मास्टर्स संघाचा 4-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. विजयी संघाकडून सतीश(18मि.), सुरेन एस(28मि), जेम्स(31, 47मि.) यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
निकाल : अंतिम फेरी : खुला गट :
सीएमएस फाल्कन अ: 5(शिबू सनी 45मि., जेफ्री डिसुझा, फवाद धुंडवरे, विकी राजपूत, अश्विन विजयन) टायब्रेकरमध्ये वि.वि.फातिमा इलेव्हन: 4(सूरज पेरियार 24मि., एरॉन डिसुझा, दिपक, शॉन परेरा)(गोल चुकवले- सूरज पेरियार ); पुर्ण वेळ: 1-1:
40 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
आकतसुखी: 4(सतीश 18मि., सुरेन एस 28मि., जेम्स 31, 47मि.) वि.वि. पुणे मास्टर्स: 0.