Ajit Pawar Plane Crash Death: कमी दृश्यमानता, मग लँडिंग का? अपघातानंतर उपस्थित झालेले ५ प्रश्न
Ajit Pawar Plane Crash Death: राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अपघातानंतर चौकशीची मागणी तीव्र झाली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत त्यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांचे विमान कसे कोसळले आणि कोणाचा निष्काळजीपणा जबाबदार होता, याही चर्चांना उधाणा आले आहे. या सगळ्यात अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पाच मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या मते, लँडिंग दरम्यान उद्भवलेल्या अडचणींमुळे हा अपघात झाला असावा. मात्र, प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि त्याला कोणते घटक कारणीभूत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Ajit pawar Plane crash Death: ‘अजित पवार महायुती सोडणार होते?; ममता बॅनर्जींचे खळबळजनक विधान
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे लँडिंग करण्याचा एकदा नव्हे तर दोनदा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या प्रयत्नात परिस्थिती अनुकूल नसतानाही दुसरा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच वेळी विमान कोसळले. प्रतिकूल स्थितीत दुसऱ्यांदा लँडिंगचा धोका का पत्करला गेला, याची आता चौकशी होत आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समोर आलेल्या अपघाताच्या एका व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ‘कमी दृश्यमानते’चा तांत्रिक दावा किती खरा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कमी दृश्यमानतेचा दावा केला जात असला तरी, अशा परिस्थितीत लँडिंगचा धोका का पत्करला गेला, हा मोठा प्रश्न आहे. बारामती विमानतळावर धावपट्टी स्पष्ट दिसत नसताना वैमानिकाने पर्यायी विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला नाही, याचा तपास आता विशेष समिती करत आहे.
अजित पवार ज्या ‘लिअरजेट-४५’ (Learjet 45) विमानाने प्रवास करत होते, त्याच कंपनीच्या एका विमानाला २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. सुदैवाने त्या वेळी सर्व प्रवासी बचावले होते, परंतु या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल तेव्हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. असे असतानाही, या विमानाला उड्डाणाची परवानगी कशी देण्यात आली आणि ते प्रवासासाठी सुरक्षित होते का, याबद्दल तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती
दुर्दैवी विमान अपघातानंतर सरकारी आणि नागरी वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित विमान ज्या कंपनीचे आहे, म्हणजेच ‘व्हीएसआर एव्हिएशन’ ही कंपनी मालक आहे. सिंग यांनी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे.
विमानात खरचं बिघाड होता का? यावर भाष्य करताना व्ही.के. सिंह यांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही.






