Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral News : नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी बांधलेले व्यापारी संकुलात लवकरच बाजार भरणार आहे.या संकुलातील 104 गाळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा काढण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2025 | 05:36 PM
नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

नेरळमधील व्यापारी संकुल लवकरच खुले होणार, १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा

Follow Us
Follow Us:

कर्जत: रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी बांधलेले व्यापारी संकुलात लवकरच बाजार भरणार आहे.या संकुलातील 104 गाळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा काढण्यात आली आहे.दरम्यान या निविदा प्रक्रिया मध्ये नेरळ संकुलात नक्की टपरी धारक यांना गाळे मिळणार की अन्य कोणाला याबाबत खुलासा नसल्याने नेरळ गावातील फुटपाथ रिकामे होणार का? हा प्रश्न काय आहे.

नेरळ संकुल प्राधिकरणाने नेरळ बाजारपेठेत व्यापारी संकुल बांधले आहे.या संकुलाचे बांधकाम २०२२ मध्ये पूर्ण झाले असून मागील तीन वर्षे संकुल बंद आहे.रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जात नव्हते. साधारण अडीच कोटी खर्चून बांधलेले या संकुलातील गाळ्यांचे वाटप नेरळ बाजारपेठ मधील रस्ता रुंदीकरण करताना रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या टपरीधारक यांना देण्यात येणार होते.रस्त्यावरील टपऱ्या तोडण्यात आल्यानंतर नेरळ गावातील रस्ते तयार करण्यात आले.

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

मात्र त्यामुळे नेरळ गावातील बाजारपेठ मधील वाहतूक कोंडी टपरी धारक यांच्या कडून फुटपाथ अडवल्याने आजही कायम आहे.टपरी धारक यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलात अद्याप पर्यंत टपरीधारक यांना गाळे देण्यात आले नाहीत.गाळे मिळावे यासाठी अनेक वेळा टपरी धारक नेरळ ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषद मध्ये जाऊन आले आहेत.त्या त्या वेळी सदस्य
मंडळ नसल्याने व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वितरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही असे सांगितले जात होते.

मात्र १७ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हा परिषदेने व्यापारी संकुल मधील १०४ गाळ्यांचे वाटप करण्यासाठी इ निविदा काढली आहे.ही निविदा काढताना एक एक गाळा वाटप करण्यात येईल अशी निविदा काढलेली नाही तर एकावेळी १०४ गाळ्यांचे वाटप ठेकेदाराला केले जाणार आहे.त्यानंतर संबंधित ठेकेदार हा भाडेतत्वावर गाळे देणार आहे.एक एक गाळा घेता येणार नसल्याने व्यापारी संकुलातील गाळे ठेकेदाराच्या घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नेरळ मधील मूळचे टपरीधारक यांच्याकडून केला जात आहे.

मागील महिन्यात रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी नेरळ गावातील व्यापारी संकुलाची पाहणी केली होती.त्यानंतर लगेच त्या संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यापूर्वी अनेक वर्षे जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने हा धोरणात्मक निर्णय त्या त्या काळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला नव्हता.तर मग आजही रायगड जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ अस्तित्वात नसताना देखील नेरळ व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.हे कोणत्या नियमाला धरून असल्याचं प्रश्न व्यापारी संकुलात गाळा मिळेल या आशेवर असलेली टपरीधारक यांना पडला आहे.पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा धोरणात्मक निर्णय सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यावर घेईल असे सांगत असताना सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हा निर्णय घेतल्याने टपरीधारक नाराज आहेत.एवढे वर्षे आम्हाला टपरी ऐवजी गाळे देण्याचे दिलेले आश्वासन ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद का पाळत नाहीत? असा प्रश्न टपरी धारक उपस्थित करीत आहेत.

दोन वर्षे वितरण प्रक्रिया का नाही?

व्यापारी संकुलातील आता गाळ्यांचे होणारी प्रक्रिया ही आणखी काही महिने थांबवावी.दोन महिन्यात जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असताना व्यापारी संकुलातील गाळ्यांचे वाटप करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.ही निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी नेरळ मधील टपरी धारक करीत आहेत.

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Web Title: Commercial complex in neral will open soon tenders to be issued for the allocation of 104 shops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • neral

संबंधित बातम्या

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
1

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा
2

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
3

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा
4

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.