सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असते. ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्या कारभारावर विविध प्रश्न उपस्थित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी कोल्हारे येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी प्रामुख्याने सरपंच महेश विरले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी केले.ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम अद्याप पूर्ण नाही ते ग्रामपंचायत निवडणूक होई पर्यंत पूर्ण केले जाणार नाही असे विजय हजारे यांनी जाहीरपणे सांगितले. भाड्याच्या जागेतून ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार चालवला जात असून स्वतःच्या मालकीचे कार्यालय बंद ठेवले जात असताना रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती गप्प का? असा सवाल हजारे यांनी व्यक्त केला. मध्यरात्री कार्यालय उघडून कोणती कामे केली गेली असा सवाल हजारे यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक राहायला आले आहेत. त्या सर्व या ग्रामपंचायतमध्ये वोटिंग कार्ड बनवून घेतली आहे.त्यातून मोठ्या प्रमाणात बोगस असल्याचे निदर्शनास येत असून ग्रामपंचायत हद्दी मधील सर्व ग्रामस्थ यांची निवडणूक ओळख पत्र तहसीलदार यांनी आधार लिंक करण्याची मोहीम हाती घ्यावी असे आवाहन शासनाला करण्यात आले. सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल असताना देखील ते मोकाट फिरत होते. या सर्व प्रकरणाबाबत मी हाय कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे याच पूर्वी मी याचिका दाखल केली असते,परंतु माझी तेवढी आर्थिक स्थिती असल्यामुळे मी ते पाऊल उचलले नाही.मात्र सरपंच महेश विरले यांना अशी कामे करण्यासाठी प्रोत्साहन देणारा कोण ? याचा शोध जनतेने घ्यावा असे आवाहन हजारे यांनी केले.






