Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Case : नसरापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा बडा नेता आक्रमक; थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

नसरापुरमधील घटनेवरुन काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 05:22 PM
नसरापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा बडा नेता आक्रमक; थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

नसरापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा बडा नेता आक्रमक; थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरुन काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

सपकाळ म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत हे सातत्याने उघड होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारा आहे, हे गृहविभागाचे अपयश असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत, त्याचाच हा प्रकार असून आतातरी देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाही तर मनाची बाळगून प्रायश्चित म्हणून तरी गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री राज्याला द्यावा, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहविभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणातील निघृणता, स्वारगेट एसटी स्टँडवरील बलात्कार, केंद्रीय मत्र्यांच्या घरातील मुलींना छेडछाड, बदलापूरातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार, अशोक खरात प्रकरण, महिला व मुलींचे बेपत्ता होणारे प्रकार…ड्रग्जच्या खुलेआम काळ्याधंद्याने उडता महाराष्ट्र झाला आहे, तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत ढकलले जात असताना गृहमंत्री म्हणून काहीतरी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे पण फक्त घोषणा होतात कारवाई मात्र काहीच होत नाही. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा याला थेट गृहमंत्रीच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल करत भाजपा महायुती सरकारचा भ्रष्टाचार सुस्साट असून जनता व प्रशासन यांच्यात मिसिंगलिंक आहे, कायदा व सुव्यवस्थेमध्ये मिसिंग लिंक आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

देशभर जनगणना सुरु झाली असली तरी जातनिहाय जनगणना मात्र होत नाही. जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधांनी केली होती पण ती आता करत नाहीत कारण हा व्यक्ती फक्त फेकूच नाही तर अत्यंत खोटारडा आहे. मुंह में राम और बगल में नथुराम, असे त्यांचे काम आहे. मोदी यांचा आचार, विचार व व्यवहार हे अगदी उलटे आहे. नथुराम गोडसे महात्मा गांधींच्या पाया पडला व नंतर त्यांचा खून केला, मोदी संसदेच्या पाया पडले व त्यांनी संविधान व लोकशाहीचा गळा घोटला. १०० स्मार्ट सिटी, दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, रुपयाची घसरण थोपवणे यातील काहीच त्यांनी केलेले नाही. आता जनगणनेसाठी आधार कार्ड मागत आहेत, ते लिंक करणार आहेत, आधारशी सर्व लिंक केलेले आहे, पण मतदार यादीशी ते लिंक करत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : सेल्फीचा मोह जीवावर बेतला! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

Web Title: Congress demands resignation of home minister devendra fadnavis over nasrapur case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

शिक्षणाचा बोजवारा, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचा संताप; सरकारला दिला इशारा
1

शिक्षणाचा बोजवारा, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचा संताप; सरकारला दिला इशारा

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका
2

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळांची टीका

अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा
3

अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

Harshvardhan Sapkal : विधानपरिषद उमेदवारीवरुन नेमकं काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच सांगितलं
4

Harshvardhan Sapkal : विधानपरिषद उमेदवारीवरुन नेमकं काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.