Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील साखर कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 12:54 PM
अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

अंबुलगा कारखान्याची ऊसबिले थकीत, शेतकरी संकटात; दांपत्याचा विष प्राशन करण्याचा इशारा

Follow Us
Follow Us:

निलंगा : निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील साखर कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. ‘ओमकार साखर कारखाना’ लीजवर चालवत असलेल्या या कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उघड अडवणूक सुरू असून, ऊस तोडून तब्बल चार महिने उलटले तरी घामाचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. एकीकडे शेतीचा खर्च, कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कारखान्याची टाळाटाळ या दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी आज अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे हे अनेक महिन्यांपासून संपर्काबाहेर असल्याने “दाद मागायची तरी कुणाकडे?” असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.

 

“लग्नाच्या पत्रिका वाटल्या पण हाती पैसा नाही! “शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून पिकवलेला ऊस जानेवारीतच कारखान्याला दिला. नियमानुसार १४ ते १५ दिवसांत मिळणारे बिल आज चार महिन्यांनंतरही प्रलंबित आहे. या पैशांवर अनेक कुटुंबांची स्वप्ने उभी होती. मुलींची लग्ने ठरली, पत्रिका छापून गावोगावी वाटल्या गेल्या पण आता हातात दमडी नसल्याने तीच लग्ने मोडण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी तर लग्नपत्रिका अर्जासोबत जोडून कारखाना प्रशासनासमोर अक्षरशः हात जोडले, पण प्रशासनाच्या हृदयाला पाझर फुटलेला दिसत नाही. कारखान्याच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांची पायपीट दररोज कारखान्याच्या फेऱ्या मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजल्या, पण उत्तर मात्र शून्य !” आज देतो, उद्या देतो” अशा आश्वासनांचा खेळ सुरूच आहे. साधे समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. ज्या कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर उभारी घेतली, तोच आज त्यांच्या जिवावर उठल्याचे विदारक चित्र निलंगा परिसरात पाहायला मिळत आहे.

“आम्ही काबाडकष्ट करून ऊस पिकवला, कारखान्याने तो नेला पण आता आमच्या घामाच्या पैशांसाठी आम्हालाच भिकाऱ्यासारखे उभे राहावे लागते,” अशी वेदना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अंबुलगा येथील पीडित शेतकरी दिलीप विश्वनाथ मिरगाळे आणि त्यांच्या पत्नी शिवनंदा मिरगाळे यांनी १ मे, कामगार दिनी कारखाना परिसरात विष प्राशन करण्याचा इशारा दिला . हा इशारा केवळ एका कुटुंबाचा नसून, संपूर्ण शेतकरी वर्गाच्या असहायतेचा आणि संतापाचा ज्वालामुखी आहे.

हे सुद्धा वाचा : पादुका दर्शन साेहळ्यातील उलाढालीत मोठा घोळ! कदम महाराजांनी हात झटकले; प्रकरणाला नवे वळण

Web Title: Farmers are in trouble as they are not getting money from the ambulga factory for selling sugarcane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
4

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.