संग्रहित फोटो
सभेत तौलनिक संख्याबळानुसार एक स्थायी समिती व पाच विषय समित्या आणि प्रत्येक समितीत पाच सदस्य अशी रचना निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक समितीत राष्ट्रवादीला तीन तर भाजपला दोन सदस्य देण्याची संधी होती. राष्ट्रवादीकडून सर्व समित्यांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. मात्र भाजपकडून एकही सदस्य नामनिर्देशित न केल्याने भाजप नगरसेवकांचा समित्यांमध्ये समावेश होऊ शकला नाही. परिणामी, प्रत्येक समितीत दोन जागा रिक्त राहिल्या. तसेच सूचक आणि अनुमोदक उपलब्ध नसल्याने नियोजन व विकास समिती स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे ही समिती सध्या रिक्त राहिली आहे.
दोन समित्या द्या, मागणी फेटाळली
दरम्यान, भाजप गटनेते दिनेश ढोरे यांनी राष्ट्रवादीवर टीका करत सांगितले की, उपनगराध्यक्ष निवडणूकप्रसंगी आम्ही गावच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका घेत माघार घेतली होती. त्यावेळी विषय समित्यांमध्ये किमान दोन समित्यांचे सभापतीपद भाजपला द्यावे, अशी आमची मागणी होती. मात्र राष्ट्रवादीने ती मागणी फेटाळल्याने आम्ही एकही सदस्य नामनिर्देशित न करता विषय समित्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
हे सुद्धा वाचा : महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले
बहिष्कारामुळे राजकीय वातावरण तापले
या बहिष्कारामुळे वडगाव नगरपंचायतीतील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात याचे पडसाद नगरपंचायतीच्या कामकाजावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, राष्ट्रवादीचे गटनेते अजय म्हाळसकर, पक्षप्रतोद माया चव्हाण, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्षप्रतोद अनंता कुडे, नगरसेवक पूनम भोसले, रोहित धडवले, सुनीता डोरे, रूपाली ढोरे, विशाल वहिले, अजय भवार, सारिका चव्हाण, आकांक्षा वाघवले, गणेश म्हाळसकर, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, स्वीकृत नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, संदीप म्हाळसकर उपस्थित होते.






