Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजप अन् RSS चा डाव हाणून पाडा; काँग्रेसचे आवाहन

भाजपा व संघाचा डाव हाणून पाडा व संविधानाचा विचार अंगिकारावा तोच देशाला ताराणारा आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 11:45 AM
Congress suspends Sahebrao Kamble, Congress suspends Shailesh Aggrawal, Vidhan Parishad Election, Harshvardhan Sakpal,

Congress suspends Sahebrao Kamble, Congress suspends Shailesh Aggrawal, Vidhan Parishad Election, Harshvardhan Sakpal,

Follow Us
Follow Us:

त्र्यंबकेश्वर : देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. पण या विचारधारेला छेद देऊन लोकांना लाचार बनवणारी शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे. संविधान विरूद्ध मनुवादाच्या या लढाईत माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ वर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपा व संघाचा डाव हाणून पाडा व संविधानाचा विचार अंगिकारावा तोच देशाला ताराणारा आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

त्र्यंबकेश्वर येथील कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राजसत्ता व धर्मसत्ता ही मुठभर विशेष लोकांच्या हाती असावी हा संघाचा विचार आहे. सत्ता, संपत्ती, द्वेष, भय, यातून धर्मांध राजकारण करत आहे. अधिकार नाकारणारा, हम करे सो कायदा हा भाजपा विचार आहे. मागील काही वर्षात हा मनुवाद वाढत आहे. अब की ४०० पार कशासाठी तर संविधान बदलण्यासाठी भाजपाला हवा आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला. काँग्रेसची विचारधारा संविधानाची विचारधारा आहे. समता, बंधुता, शांती, सर्वांना समान न्याय हक्क, स्त्री पुरुष समानता असा आहे.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर, वारकरी संप्रदायाचा विचार आहे, महापुरूषांचा विचाराला एक प्रवाह आहे आणि तो काँग्रेसचा विचार आहे. भाजपाची आयडिया ऑफ इंडिया व काँग्रेस ची आयडिया ऑफ इंडिया यात मोठा फरक आहे. आपल्याला काँग्रेसच्या आयडिया ऑफ इंडियाचा विचार पुढे घेऊन जायचे आहे. काँग्रेसच्या विचारानेच शिक्षण हक्क कायदा, मनरेगा, माहितीचा अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा दिला. काँग्रेसचा आत्मा व देशाचा आत्मा एकच आहे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : युद्धामुळे विवाह अडचणीत! लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या; कॅटरिंग व्यावसायिकांची चिंता वाढली

समारोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वसंत पुरके यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारच्या धर्मांध राजकारणावर सडकून टीका केली. भाजपाची फोडा आणि राज्य करा निती असून समाजात जाती धर्मांमध्ये भांडणे लावून भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानामुळे आणि काँग्रेस सरकारांनी राबवलेल्या धोरणांमुळे या देशातील गरीब, ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजाला शिक्षण व अधिकार मिळाले. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात आले. भाजप सरकार हळूहळू या सर्वांचे हक्क काढून घेत आहे. त्यांच्या कल्याणकारी योजनांवरील निधीची कपात करत आहे. विकासाची स्वप्ने दाखवून भाजप समाजात विभागणी करत आहे. भाजपाच्या दडपाशाहीला व भूलथापांना बळी पडू नका, काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो असे वसंत पुरके म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुलकर्णी, शाह आलम शेख, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनीही या शिबिराला मार्गदर्शन केले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp and rss 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • RSS

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.