भुवनेश्वर कुमार (फोटो- ians)
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सिरीजमध्ये शानदार सुरुवात करत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारत सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. मात्र भारताची गोलंदाजी साधारण राहिलेली आहे. तब्बल चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी हे दोन्ही सामने निराशाजनक ठरले आहेत. भुवनेश्वर कुमारने या दोन्ही सामन्यांमध्ये केलेल्या गोलंदाजीत त्याने 99 रन्स केले. यामध्ये त्याला केवळ 1 विकेट घेता आली होती.
IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…
भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने गोलंदाज भुवनेश्वर कुमारबाबत भाष्य केले आहे. मोर्ने मोर्कलन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीबाबत भाष्य केले आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव घेण्याची काहीच गरज नाही. भुवनेश्वर हा अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत. सुरुवातीला काही अडचणी येण्याची शक्यता असते. जुन्या गोष्टींचा विचार न करता भुवीने केवळ आपल्या नैसर्गिक खेळावर आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे मॉर्नी मॉर्केल म्हणाला आहे.
भुवनेश्वर कुमार चार वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. सुरुवातीचे काही सामने त्याला थोड्या अडचणी येऊ शकतात असे गोलंदाजी प्रशिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या तो थोडासा खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच्या भेदक गोलंदाजीने आयपीएलमध्ये आरसीबीला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.
ENG vs IND : हॅरी ब्रुकचे वादग्रस्त विधान, ‘गिल सेना’ने धडा शिकवला! मॉर्केलने उडवली खिल्ली
भुवनेश्वर कुमारने आरसीबीला आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आयपीएल २०२६ च्या १६ सामन्यांत तब्बल २८ विकेट्स घेत धुमाकूळ उडवणारा भुवी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनानंतर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मात्र छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. सलग दोन सामन्यांत ९९ रन पेलवल्यानंतर भुवनेश्वर कुमारवर क्रीडा वर्तुळातून टीका होत असली, तरी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल आणि भारतीय संघ त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.
Ans: उद्या दुपारी भारतीय वेळेनुसार हा सामना 12.30 वाजता सुरू होणार आहे
Ans: भुवनेश्वर कुमारने कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव घेण्याची काहीच गरज नाही, असे म्हटले आहे.






