Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 04:15 PM
आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर...; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर...; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

 

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आमदार संजय गायकवाड हे सातत्याने दादागिरी व गुंडगिरी करत असतात. आमदार कॅटिंनमध्ये कामगारांना मारहाण करणे, बुलढाण्यात वाळू तस्करी, जबरदस्तीने जमीन बळकावणे, कोणालाही अत्यंत खालच्या भाषेत शिविगाळ करणे, ही त्यांची गुन्हेगारी कृत्त्ये सुरुच आहेत. एवढेच काय तर भाजपा हा हिजड्यांचा पक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडा, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस देऊ, असे प्रताप या आमदार महोदयांनी यापूर्वी केले आहेत. फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलेल्या शिव्यांची तरी दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, पण मुख्यमंत्री मात्र या आमदाराला पाठीशी घालत आहेत, असे सपकाळ म्हणाले.

‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक आपल्यासाठी मोठा दस्तावेज आहे, पण या पुस्तकावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचाही अपमान केला. भाजपा व त्यांचे हस्तक शिवाजी महाराज यांचा अवमान करत असतात, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यासारख्या विकृत्तांनी महाराजांचा अपमान केला त्यावेळीही फडणवीस यांनी बोटचेपी धोरण स्विकारले होते. भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांचा अपमान केला, त्यावेळीही फडणवीस यांनी काहीच कारवाई केली नाही. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचे फडणवीस एकप्रकारे समर्थनच करत आहेत, असे यावरून दिसते असेही सपकाळ म्हणाले.

रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठीचे संवर्धन झालेच पाहिजे, त्यावर दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा अवगत झाली पाहिजे पण त्यासाठी सक्ती करण्याची गरज नाही, हा केवळ ध्रुवीकरणाचा प्रकार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण त्यापुढे सरकारने काहीच केले नाही, राज्यातील सरकारी खासगी अशा प्रत्येक विद्यापीठात मराठीचा स्वतंत्र विभाग निर्माण केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांची ‘गॅस’कोंडी! बुकिंग करूनही सिलिंडरचा पत्ता नाही; वितरण व्यवस्था कोलमडली

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded action against mla sanjay gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
3

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
4

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.