Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2025 | 03:56 PM
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे.

भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे. लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले तर मी उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरील पुस्तक भेट दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has met uddhav thackeray in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • Cmomaharasahtra
  • Harshvardhan Sapkal
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
2

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
3

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
4

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.