Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच आहेत या मराठीला हात लावाल तर खरबरदार, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 15, 2025 | 06:37 PM
महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी शिकवू व ती टिकवू. महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच आहेत या मराठीला हात लावाल तर खरबरदार, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीचा जो नंगानाच घातला गेला त्याचा उगम माजी सरसंघचालक गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकातून आलेला आहे. भाजपा व संघाला भारताचे संविधान मान्य नाही, विविधतेत एकता ही आपली ओळख आहे तर भाजपाला मात्र वन नेशन वन इलेक्शन, वन लँगवेज आणायची आहे. विविधता नाकारणारी विखारी व विषारी अशी ही संकल्पना बंच ऑफ थॉटमधून आलेली आहे. हिंदी, हिंदुत्व व हिंदुराष्ट्र ही संकल्पना भाजपा व संघाला राबवायची आहे, त्यासाठीच भाजपा सरकारने हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे, असं सपकाळ म्हणाले.

या कार्यक्रमासाठी मीरा रोडच का निवडले हे सांगताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसची भूमिका नरोवा कुंजरोवा ची नाही. येथे पाय रोऊन ठामपणे भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, आम्ही मराठी, आम्ही भारतीय, हा संदेश देण्यासाठी मीरा रोडला आलो आहोत. मी मराठी बोलणार नाही हा माज योग्य नाही तसेच का बोलत नाही म्हणून मारणे हे सुद्धा चुकीचेच आहे. हिंदी सक्तीने शिक्षणाचे वाट्टोळे होणार आहे आणि पुढे जाऊन सक्तीचे मोफत शिक्षण कायदा सुद्धा रद्द केला जाऊ शकतो, असे सपकाळ म्हणाले.

प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यावेळी म्हणाले की, आता राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे त्यामुळे भाजापाने जातीवाद, प्रांतवाद व भाषावाद सुरु केला आहे. काँग्रेस सरकारने ७० वर्षात निर्माण केलेली देशाची संपत्ती विकली जात असताना तसेच जनतेचे मुलभूत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाषावाद सारखे मुद्दे उकरून काढले जात आहेत. या भागात इतर राज्यातून लोक आले व महाराष्ट्राने त्यांना आपले करून घेतले. कोणालाही जात, धर्म भाषेवरून वेगळी वागणूक दिली नाही. पण भाजपाने जाणीवपूर्वक भाषा वाद सुरु केला आहे त्यामागे राजकीय स्वार्थ आहे असे ते म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned about the marathi issue from mira bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Mumbai News

संबंधित बातम्या

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार
2

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
3

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त
4

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.