Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरेल, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 03:31 PM
TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

TET पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : भाजपा सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ व कुचकामी आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यातच हे सरकार आघाडीवर असून यांना एक परिक्षाही धड घेत येत नाही. नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात रविवार दिनांक २८ जून रोजी होणारा TET परीक्षेचा पेपर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

पेपरफुटीवर भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा सरकारला एकही परीक्षा पेपर फुटीशिवाय घेता येत नाही, सरकार पेपर फोडणाऱ्या रॅकेटचा बंदोबस्त करू शकत नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर आणि भविष्यावर पाणी फेरणाऱ्या या रॅकेटला नेमकं राजकीय संरक्षण कोणाचं आहे? एकीकडे “पारदर्शक कारभार”च्या घोषणा, तर दुसरीकडे पेपरफुटीचं अखंड सत्र सुरु आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की पेपर आधीच कोणाकडे पोहोचतोय याची चिंता करायची? विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्याही जिवाला घोर लावणारा हा पेपरफुटीचा रोग दिवसेंदिवस वाढत चालला असून, सरकार मात्र किरकोळ कारवाई करण्यापलीकडे जात नाही. पेपरफुटीच्या या रोगावर जालीम उपाय करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पेपरफुटी ही हुशार, होतकरू व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आहे. परीक्षेतील ह्या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

नीट परिक्षेचा पेपर फुटल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात आला. लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले पण अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. परदेशात जाऊन महिला पंतप्रधानांना चॉकलेट वाटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर एक वाक्यही उच्चारले नाही. विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणारा भाजपा सरकारचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. तरुण देशाचे भविष्य आहेत, त्यांच्याच भविष्याशी खेळ सुरु असून हेच तरुण भाजपाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned the government over the tet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • BJP
  • Harshvardhan Sapkal
  • TET Exam

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
3

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
4

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.