Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती…; काँग्रेसचा इशारा

पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात भाजपकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला आहे. तसेच इम्रान प्रतापगडी यांनी भाजप सरकारला इशाराही दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2026 | 01:41 PM
भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती...; काँग्रेसचा इशारा

भाजपा सरकारने राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती...; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी विशेषतः मुलींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे 8 ते 10 हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे हे मुलींच्या पहिल्या शाळेचे शहर आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात राहुल गांधी मुलींशी थेट संवाद साधणार आहेत. पुण्यातील ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमात भाजपकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला आहे. तसेच इम्रान प्रतापगडी यांनी भाजप सरकारला इशाराही दिला आहे.

इम्रान प्रतापगडी यावेळी म्हणाले की, मागील १२ वर्षापासून देश मोठ्या संकटातून जात आहे. पण आता हवा बदलली आहे, दिल्लीत जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी सरकारला जाब विचारला, या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले, पाटण्यात एके ४७ चालवण्यात आली, गोळ्या घातल्या पण ते मागे हटले नाहीत शेवटी सरकारला मागे हटावे लागले. विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केली त्यावेळी भाजपाचे मंत्री संसदेतून पळाले. जेन-झी च्या रेट्यामुळे पंतप्रधानांची झोप उडाली असल्याने रात्री अपरात्री ते व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राहुल गांधी हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘छात्रों की गुंज’ अभियान हाती घेऊन ते देश ढवळून काढत आहेत. ‘कोटा’पासून सुरु झालेला हा एल्गार अडवण्याचा भाजपा सरकारने प्रत्येकवेळी प्रयत्न केला. आता २२ तारखेला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातही अडथळा आणण्यासाठी जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु भाजपा सरकारने राहुल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती राहुल गांधी यांना अडवू शकत नाही. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी करून दाखवू, असेही इम्रान प्रतापगडी यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम’ वरून भाजपा काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवत आहे पण ज्यांनी इग्रजांना साथ दिली त्यांनी राष्ट्रभक्ती शिकवू नये असे टोला लगावत इम्रान प्रतापगडी म्हणाले की, पंडित नेहरू १२ वर्षे तुरुंगात गेले होते, काँग्रेसचे अनेक नेते जेलमध्ये गेले, इंग्रजांविरोधात लढा दिला, भाजपाचा कोण नेता स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होता हे सांगा. आपली लढाई फॅसिस्ट शक्ती विरोधात आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेसच रोखू शकते असे सांगून आता भाजपा सरकारचे काऊंडडाऊन सुरु झाले आहे, असेही इम्रान प्रतापगडी म्हणाले.

देशातील वातावण बदलले आहे, जनता आता भाजपा मोदी शाह सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजपा सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचे षडयंत्र रचले आहे. वंदे मातरम वरून भाजपाने सुरु केलेल्या षडयंत्राला बळी पडू नका. देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची संस्कृती काँग्रेसची नाही तर ‘मोहब्बत की दुकान’ हाच आपला मार्ग आहे, तो सोडू नका, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, वंदे मातरम या गिताला राष्ट्रगिताचा दर्जा हा काँग्रेसने दिला, महात्मा गांधी, पंडित जहारलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाचंद्र बोस यांच्या प्रमुख नेतृत्वात वंदे मातरमची किती कडवी गायची हा निर्णय घेतला गेला. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ते गायिले जाते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भागही घेतला नाही त्या भाजपाने काँग्रेस पक्षाला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही. समाजात वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणे हा भाजपाचा डाव असून त्यासाठीच वंदे मातरम चा वाद उकरून काढला आहे पण त्यांचा हा कुटील डाव कदापी यशस्वी होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : माझ्याशी मतभेद असतील तर राजकीय पातळीवर लढा, जनतेची कामे का रोखता?; अमोल बालवडकरांचा संताप

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, भाजपा सरकारने मागील १२ वर्षापासून देशाला लुटत आहे. लोकशाही व देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण राहुल गांधी यांनी भाजपा आरएसएसचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत. भाजपाचा खंबीरपणे मुकाबला फक्त राहुल गांधीच करू शकतात आणि देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधी यांना २०२९ मध्ये पंतप्रधान बनवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Congress leader imran pratapgarhi has warned the bjp government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
1

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
2

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
3

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
4

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.