Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

जनतेचे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 11:42 AM
काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; 'या' प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; 'या' प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • नागरिकांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक
  • रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार
  • रमेश चेन्नीथला यांचा इशारा
मुंबई : काँग्रेस पक्ष राज्यात आगामी वर्ष संघटन बांधणीवर भर देत गावपातळीपर्यंत नियुक्त्या करण्याबरोबर सेल, विभाग, सेवादलही मजबूत करणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार विकासाच्या नावावर केवळ राजकारण करत असून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, आमहत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनतेचे हे प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष विविध आंदोलने व मोर्चांच्या माध्यमातून सरकारला जाब विचारेल, असे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीची बैठक टिळक भवन मध्ये पार पडली. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले, वर्किंग कमिटाचे सदस्य नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, शिवाजीराव मोघे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीने प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. प्रचंड प्रमाणात पैसा वापरला, हा पैसा आला कुठून, असा प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची हत्या केली असे चेन्नीथला म्हणाले. विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दडपशाहीला न भिता निर्धाराने लढले व चांगले यश मिळवले. भाजपा सरकार घोटाळेबाज असून राज्यात गुंतवणूक येत नाही, ती शेजारच्या गुजरात राज्यात जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ते राजकारण करण्यात व अतंर्गत वादातच गुंतले आहेत.

चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, चंद्रपूरमध्ये महापौरपदासाठी मविआचा घटक पक्ष उबाठा शिवसेनेने काँग्रेसने पाठिंबा द्य़ावा यासाठी चर्चा झाली होती पण त्यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा दिला पण काँग्रेस पक्षाने मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी परभणीत उबाठाला पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, सर्वांशी चर्चा झाली होती. काँग्रेसने चंद्रपूरचा बदला परभणीत घेतला नाही. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी मविआ व इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांच्या कुटुंबातील लोकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असेल तर केंद्र सरकारने तशी चौकशी केली पाहिजे, असे रमेश चेन्नीथला म्हणाले. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप काँग्रेस पक्षाशी कोणीही संपर्क साधलेला नाही. जेव्हा तशी विचारणा होईल तेव्हा पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

हे सुद्धा वाचा : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…

Web Title: Congress leader ramesh chennithala has warned the government over citizens issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
1

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
2

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
4

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.