Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली? सचिन सावंतांचा टोला

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर- २ सरकारला तीन वर्षे का लागली? आता पालघर साधु हत्येच्या विषयाचा राजकीय उपयोग महायुतीसाठी संपला का? असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2025 | 11:39 AM
पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली? सचिन सावंतांचा टोला

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली? सचिन सावंतांचा टोला

Follow Us
Close
Follow Us:
  • पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरुन काँग्रेसची टीका
  • सचिन सावंत यांनी सरकारवर साधला निशाणा
  • भाजपा कार्यालयाच्या जागेवरुनही विचारला सवाल

मुंबई : भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर- २ सरकारला तीन वर्षे का लागली? आता पालघर साधु हत्येच्या विषयाचा राजकीय उपयोग महायुतीसाठी संपला का? असे सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, पालघरमधील साधूंच्या दुर्दैवी हत्येचा तपास मविआ सरकारने केला होता. ही हत्या मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे गैरसमजातून झाली हे स्पष्ट होते. मरण्यापूर्वी स्वतः साधूंनी त्यांना जमाव चोर समजत आहे हे पोलिसांना सांगितले हे प्रथम तपासणी अहवालात स्पष्ट नमूद आहे. गडचिंचले गावात दहा वर्षे भाजपाची सत्ता असून आरोपींमध्ये काही भाजपाचे कार्यकर्ते होते असे असूनही भाजपाने मात्र या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी यामागे मोठे कारस्थान असल्याचा बोभाटा केला होता. मविआचे सरकार अनैतिक पद्धतीने घालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही केस सीबीआयला सोपवली. धर्मवीर २ चित्रपटात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ही घटना कारणीभूत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

याच अनुषंगाने महायुती सरकारने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी हे प्रकरण सीबीआयकडे देत असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले. परंतु त्यानंतर जवळपास चौदा महिन्याच्या कालावधीनंतर ६ फेब्रुवारी २०२४ ला सरकारने त्याचा आदेश काढला. या आदेशान्वये तपास करावयाची कलमे चुकीची असल्याचा साक्षात्कार राज्य सरकारला त्यानंतर अजून सव्वा वर्षानंतर झाला. २२ मे २०२५ रोजी मुळ आदेशाचे शुद्धीपत्रक काढून कलमे बदलण्यात आली आणि या आदेश व शुध्दी पत्रकान्वये ८ ऑगस्ट २०२५ ला केंद्र सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सीबीआयने पालघर मधील कासा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले तीन एफआयआर पुन्हा नोंदवले. सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात तीन वर्षे एवढा वेळकाढूपणा का केला, असा प्रश्न उपस्थित करून पालघर हत्या प्रकरणाची राजकीय गरज संपली आहे का, धर्मवीर -२ याचे उत्तर देतील का? असे सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या दुर्दैवी मृत्यूचा राजकीय उपयोग करण्यासाठी सीबीआय तपासावर बसून राहिली. एका मृत्यूचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाच वर्षे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता पालघर साधु हत्येच्या प्रकरणावर किती काळ बसून राहणार हे सीबीआयने स्पष्ट करावे, असे सावंत म्हणाले.

भाजपा कार्यालयाच्या जागेचा व्यवहार संशयास्पद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत भाजपा कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले पण भाजपा कार्यालयासाठीच्या या जागेचा व्यवहार संशयास्पद आहे. ही जागा शेड्यूल W मध्ये असताना व महापालिकेने ताब्यात घेतली असताना हस्तांतरण कसे झाले? व महाराष्ट्र राज्य सहकारी हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला भाडेकरार वाढवून का दिला नाही? याचे उत्तर महापालिका आयुक्तांनी दिले पाहिजे. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. पालिकेच्या कोट्यवधी रुपयांची जागा केवळ ८ कोटी ९१ लाख रुपयात भाजपाला कशी मिळाली? या व्यवहारात तीन राष्ट्रीय बँकाही गुंतल्या आहेत. या बँकांनी महापालिकेची संमती न घेता या जागेच्या ४६% हिस्सेदाराला कर्ज कसे दिले व ज्याच्या बरोबर या बँकांनी या कर्जाची व महाराष्ट्र राज्य सहकारी हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनने आपल्या ५४% हिश्शाची सेटलमेंट केली तो एकनाथ बिल्डर कोण आहे व त्याचा भाजपाशी काय संबंध आहे?असे प्रश्न उपस्थित करून याप्रश्नी राज्य सरकार व महापालिकेने खुलासा करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

Web Title: Congress leader sachin sawant has criticized the government over the palghar sadhus case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Palghar news
  • sachin sawant

संबंधित बातम्या

माळशिरसमध्ये ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
1

माळशिरसमध्ये ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय
2

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल
3

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

रुग्ण बेडवर अन् डॉक्टर सुट्टीवर; मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार
4

रुग्ण बेडवर अन् डॉक्टर सुट्टीवर; मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.