Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 06:22 PM
रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

मुरबाड -कल्याण मार्गांवर इको कारच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेस पक्षाकडून श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान १५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच या अपघाताला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली. कल्याणसह राज्यभरात विविध ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरु असून, त्यातून अपघात घडतात, पण परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस हप्ते घेऊन याकडे दुर्लक्ष करतात. परिवहन मंत्र्यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या मालकीच्या जमिनीतील वाट्याच्या राजकारणात गुंतण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर अपघातांचे प्रमाण कमी झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारच्या अपयशामुळे अपघातांमध्ये वाढ

काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला होता, तर ६ मार्च रोजीही त्याच मार्गावर तीन मजुरांचा बळी गेला होता. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि मुंबईसह राज्यभारातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते. हे अपघात परिवहन विभागाच्या गलथानपणाचे परिणाम आहेत. २०१९ साली राज्यात रस्ते अपघातांत १२,७८८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये ही संख्या २३ टक्क्यांनी वाढून १५,७१५ वर पोहोचली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या देखील चिंताजनकरीत्या वाढत आहे. २०२४ मध्ये या मार्गावर १३७ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ३७ टक्क्यांनी वाढून १८५ वर पोहोचली. मृतांची संख्या २०२४ मध्ये १२६ वरून २०२५ मध्ये १५२ इतकी वाढली आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी परिवहन आयुक्तांनी माध्यमांसाठी जारी केलेल्या निवेदनात समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या दडवण्याचा प्रयत्न केला. परिवहन विभागाने आपले अपयश लपवण्यासाठी केलेली ही धडपड सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Congress party has demanded the resignation of transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Accident Case
  • Harshvardhan Sapkal
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
1

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
2

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
3

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
4

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.