मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resignation) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी घेण्याची गरज उरली नाही. भाजपचा (BJP) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची (Congress Reaction On Uddhav Thackeray Resignation) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख ही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले गेले. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल https://t.co/sQfcMrOxZe
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 29, 2022
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं की, “मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली. त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःखही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले होतं. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल.”
महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष सत्तेत होतं आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं आहे. त्याच दु:ख काँग्रेसलाही झालं आहे, हे सचिन सावंतांच्या ट्विटमधून स्पष्ट होतं.