Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडा संकुलासाठी आमदार सुनिल शेळके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी मागील तीन वर्षांपासून आमदार सुनिल शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.बुधवार (दि.9 रोजी) मुंबई मंत्रालय येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन आमदार शेळके यांनी दिले.

  • By Aparna
Updated On: Aug 09, 2023 | 06:25 PM
क्रीडा संकुलासाठी आमदार सुनिल शेळके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
Follow Us
Follow Us:
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल व्हावे यासाठी मागील तीन वर्षांपासून आमदार सुनिल शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत.बुधवार (दि.9 रोजी) मुंबई मंत्रालय येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन क्रीडा संकुल उभारण्याच्या कामासंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन आमदार शेळके यांनी दिले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त करता यावा या उद्देशाने शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ हे धोरण राबविले होते.परंतु मावळ तालुक्यात संकुल उभारण्याबाबत कुठलीही पावले उचलण्यात आली नव्हती.परंतु सुनिल  शेळके आमदार झाल्यावर त्यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला आहे.याबाबतीत अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता.जांभुळ गावाजवळ क्रिडा संकुलासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली होती.
मावळ तालुक्याला क्रीडा क्षेत्राची समृद्ध परंपरा असून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. तालुक्यातून अनेक युवा खेळाडुंनी विविध क्रीडाप्रकारात चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळविलेला आहे.क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत यश मिळविण्यासाठी सुसज्ज क्रीडांगणा अभावी ग्रामीण भागातील मुलांना विविध स्पर्धांना मुकावे लागते.क्रीडा क्षेत्रातील कौशल्य असुनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रिडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुना देखील अडचणी येत आहेत. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन अद्ययावत व सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील. मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करुनही अद्याप ठोस निर्णय झाला नाही.तरी मावळ तालुक्यात क्रिडा संकुल उभारणे कामासंदर्भात क्रिडा मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन व्हावे,अशी विनंती मंत्र्यांकडे केली असून लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल,असे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले आहे.अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

Web Title: Consistent pursuit of mla sunil shelke for sports complex nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2023 | 06:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • maval news
  • Pune
  • Sunil Shelke
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
3

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.