
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारत संविधान लागू झाल्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त केंद्र सरकारने ‘संविधान जागर यात्रा २०२४’ सुरू केली आहे. केंद्र सरकार ‘संविधानअमृत महोत्सव’ साजरा करत आहे. लोकांना त्यांच्या संवैधानिकअधिकारांची माहिती देणे आणि लोकशाहीविरोधी खोटी माहितींचा प्रसार रोखण्यासाठी ही मोहिम आखली आहे. संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक असून ८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे. रायगड जिल्ह्यातून अनेक जणांचा या यात्रेत सहभाग असून संविधान जागर समिती या यात्रेचे आयोजक आहे.
संविधान जागर यात्रेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड आणि वाल्मिक निकाळजे सहभागी झाले होते. विजयराव गव्हाळे , योजनाताई ठोकळे, स्नेहाताई भालेराव, नितीनभाऊ मोरे, आकाशजी अंभोरे, नागसेनजी पुंडगे आदी मान्यवर या यात्रेसाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत.
खोटा प्रचार करून लोकांमध्ये शंका निर्माण केली
या यात्रा ९ ऑगस्ट रोजी महाड येथून सुरू झाली असून आता आता पर्यंत या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी तसेच संविधानाविरोधी वाढत्या विरोधी प्रचाराचा प्रतिकारकरण्यासाठी हि संविधान यात्रा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात आणित्यानंतर विरोधकांनी संविधानाबाबत खोटा प्रचार करून लोकांमध्ये शंका निर्माण केलीआहे. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकसमुदायात भिती निर्माण झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानावर झालेल्या ‘आघात’ला सर्वात मोठा धोका मानले आणि या मुद्द्यावरनिवडणूक मोहीम राबवली होती. काँग्रेसने केलेले आरोप कायदेशीर आधारावर टिकू शकणार नाहीत, सुप्रीम कोर्टाने ‘केसवनंद भारती’ निर्णयात संविधानाच्या मूलभूत रचनेलाबदलता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही विरोधकांनी अनुसूचित जातींच्या लोकांमध्ये संविधान नष्ट होईल अशी भीती निर्माण केली असे समितीने म्हटले आहे. संविधानाबाबत लोकांना खरी माहिती समजूनघेण्यात अडचण येते. यामुळेच संविधान जागर समितीने या मोहिमेद्वारे लोकांनासंविधानाच्या मूलभूत मूल्यांची माहिती देण्याचा आणि विरोधकांच्या खोटी माहितीचीपोलखोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाहू, फुले, आणि आंबेडकर यांच्या नावाने खोटी अफवा
“काही व्यक्तीप्रगतीवादाचे मुखवटे घालून शाहू, फुले, आणि आंबेडकर यांच्या नावाने खोटी अफवा पसरवत आहेत. या व्यक्तींनी शाही,फुले, आणि आंबेडकर यांच्या खऱ्या आदर्शांचा समज घेतला नाही आणि समाजात जातीय राजकारण पसरवून सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्नकरत आहेत. ही यात्रा त्यांच्या छुप्या अजेंड्याचा खुलासा करून जनतेला माहितीदेण्याचा प्रयत्न करेल.”.विजयराव गव्हाळे वक्ते संविधान जागर समिती