Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra employees : सहा महिन्यांपासून मानधन नाही; पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 06:16 PM
सहा महिन्यांपासून मानधन नाही; पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

सहा महिन्यांपासून मानधन नाही; पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू

Follow Us
Follow Us:
  • सहा महिन्यांपासून मानधन नाही
  • पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू
  • गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
सातारा : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

या आंदोलनात गट समन्वयक आणि समूह समन्वयक पदावर कार्यरत कर्मचारी सहभागी झाले आहेत. हे कर्मचारी 2012 पासून कंत्राटी तत्त्वावर काम करत असून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत करणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी हे कर्मचारी काम करत असल्याचे सांगितले जाते.

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत योगदान देणारे गट समन्वयक व समूह समन्वयक पदावरील कर्मचारी २०१२ पासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. मात्र डिसेंबर २०२५ पासून त्यांचे मानधन रखडल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे कर्मचारी या समस्येने प्रभावित झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत थकीत मानधन तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, राज्य सचिव जयंत वर्मा, जिल्हा सचिव फिरोज मुलाणी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. “मानधनाचा प्रश्न त्वरित निकाली काढला नाही तर पुढील आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल,” असे रोहित जाधव यांनी सांगितले.

MHADA lottery 2026: म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल

Web Title: Contractual employees protest pending salary water supply sanitation department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Jal Jeevan Mission
  • Water supply

संबंधित बातम्या

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग
1

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.