Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP CEO Yashini Nagarajan: सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशिनी नागराजन यांच्या वाहनावरील दिव्यावरून वादाची ठिणगी

Satara News : सर्वसामान्य नागरिक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी वेगवेगळे निकष लागू होऊ शकत नाहीत. त्यामुळे नियमभंग झाला असल्यास कायद्यानुसार समान कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 11:31 AM
Satara News, Yashini Nagarajan, Satara ZP, RTO Rules,

Satara News, Yashini Nagarajan, Satara ZP, RTO Rules,

Follow Us
Follow Us:

Satara ZP News: सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) याशिनी नागराजन यांच्या शासकीय वाहनावर लावण्यात आलेल्या कथित बेकायदेशीर दिव्यावरून जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सर्वसामान्य नागरिकांवर वाहन नियमभंगाबाबत कठोर कारवाई करणारे पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) प्रशासन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांबाबत मात्र मौन बाळगत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

वाहन नियमांचे उल्लंघन केल्यास सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वाहनांवरील अनधिकृत दिवे, सायरन किंवा इतर मॉडिफिकेशनविरोधात पोलीस आणि आरटीओ विभाग नियमित मोहीम राबवत असतात. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनावरच नियमबाह्य दिवा असल्याचा दावा करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Maharashtra Weather Update : वादळ वारा अन् विजा…! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना

या प्रकरणामुळे “कायदा सर्वांसाठी समान आहे का?” हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांच्या नावाखाली दंड वसूल केला जातो, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित नियमभंगाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पोलीस प्रशासनाची भूमिका काय?

रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणारे पोलीस संबंधित वाहनाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आरटीओ विभाग मौन का?

वाहन नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल; सेव्ह वॉटर मोहीम राबविणार

नियम फक्त सामान्यांसाठीच?

सर्वसामान्य नागरिक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी वेगवेगळे निकष लागू होऊ शकत नाहीत. त्यामुळे नियमभंग झाला असल्यास कायद्यानुसार समान कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वाहनावरील दिवा नियमांनुसार आहे की नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित वाहनावरील दिवा अधिकृत परवानगीनुसार आहे की नाही, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Controversy sparks in satara over zp ceo yashini nagarajans official vehicle lights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Satara News
  • Satara Police
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.