Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत झालेला नगराध्यक्ष वा नगरसेवकांचा सत्कार हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, आगामी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव असल्याचे दिसून आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 04:30 PM
Political interference reduced due to changes in regulations governing the Board of Directors of the Central District Bank

Political interference reduced due to changes in regulations governing the Board of Directors of the Central District Bank

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Political News : नांदेड : जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अचानक नवचैतन्य प्राप्त झाले असून, विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीची चाहूल स्पष्टपणे लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत झालेला नगराध्यक्ष वा नगरसेवकांचा सत्कार हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, आगामी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव असल्याचे संकेत आता उघडपणे दिस लागले आहेत. तीन नगराध्यक्ष आणि तब्बल ७४ नगरसेवकांचा सन्मान करून राष्ट्रवादीने आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. या शक्तिप्रदर्शनामागे ‘स्थानिक स्वराज्या संस्था’ मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची बीजे रोवण्याचा स्पष्ट राजकीय संदेश दडलेला असल्याची चर्चा रंगत आहे. (Nanded News)

जिल्ह्यात ही लढत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सरळ भिडणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, विद्यमान आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या कार्यकाळानंतर रिक्त झालेली जागा अद्याप भरली गेली नसून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या नगरपालिकांवर आधारित मतदारसंघ तयार करून निवडणूक घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा : पश्चिम बंगालच्या राजकारणाला सुडाची लागण? प्रचारानंतर अधीर रंजन चौधरींच्या गाडीला ट्रकची धडक

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रविण पाटील यांचे नाव चर्चेत

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव आघाडीवर आले आहे. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पकड आणि नगरसेवकांमधील प्रभाव लक्षात घेता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे, भाजपकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

पूर्वीच्या निवडणुकांतील त्यांची रणनीती आणि स्थानिक नेटवर्क हे त्यांचे बलस्थान मानले जाते. मात्र, या निवडणुकीची खरी रंगत उमेदवारांच्या पलीकडे आहे. ही लढत केवळ राजूरकर विरुद्ध चिखलीकर अशी मर्यादित न राहता, एकीकडे खासदार अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व आणि दुसरीकडे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची रणनीती, अशा दोन प्रभावी राजकीय केंद्रांमध्ये होणारी प्रतिष्ठेची टक्कर ठरणार आहे. नांदेडच्या राजकीय पटावर आता प्रत्येक हालचाल महत्त्वाची ठरणार असून, आगामी दिवसांत घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे. विधान परिषदेची ही निवडणूक केवळ जागेसाठी नसून, स्थानिक सत्तासमीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार, हेच या घडामोडींचे खरे वैशिष्ट्य ठरत आहे.

हे देखील वाचा : जिल्हा बँकांवरील राजकीय पकड सैल होणार; नव्या नियमामुळे बदलणार राजकारण, नेत्यांचे धाबे दणाणले

गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करा – खासदार गोपछोडे

नांदेड शहर व जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. अवघ्या ७० तासांत पाच हत्यांच्या घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. निवेदनात त्यांनी नमूद केले की, नांदेडमध्ये अवैध धंद्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढले असून बलात्कार, घरफोडी, लुटमार, वाटमारी आणि महिलांच्या दागिन्यांची हिसकावणी यांसारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया, गुटखा विक्री, तसेच इतर बेकायदेशीर प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुन्हेगारी रोखण्यासाठी

संपूर्ण शहरात सीसीटीव्ही आधारित
सर्व्हिलन्स यंत्रणा उभारणे, स्नेहनगर येथील जीर्ण पोलीस कर्मचारी निवासस्थानांचे पुनर्बाधकाम, पोलीस मुख्यालयातील इमारती दुरुस्त करणे, वजीराबाद येथील वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण तसेच जिल्ह्यातील पोलीस वसाहती व पोलीस स्टेशनच्या इमारती नव्याने उभारण्याच्या मागण्या त्यांनी केल्या. तसेच, गैंगस्टारांकडून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवले जात असल्याने ही चिंताजनक बाब असून यावर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी नांदेडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील व नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास दिला.

Web Title: Corporators felicitation not just a formal event but act for upcoming political equations nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • political news

संबंधित बातम्या

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा
1

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा

Adhir Ranjan Accident : पश्चिम बंगालच्या राजकारणाला सुडाची लागण? प्रचारानंतर अधीर रंजन चौधरींच्या गाडीला ट्रकची धडक
2

Adhir Ranjan Accident : पश्चिम बंगालच्या राजकारणाला सुडाची लागण? प्रचारानंतर अधीर रंजन चौधरींच्या गाडीला ट्रकची धडक

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
3

Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
4

Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.