Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा

साताऱ्यामधील अतिक्रमण विभागामध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांना निलंबित करण्याची मागणी माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या समर्थकांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 02:48 PM
Demand to Suspend Encroachment Inspector Prashant Nikam Satara News

Demand to Suspend Encroachment Inspector Prashant Nikam Satara News

Follow Us
Follow Us:

Satara News : सातारा : राजवाडा येथील गाळ्याच्या अतिक्रमणाने घेतलेला राजकीय संदर्भ आता गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे .अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी अतिक्रमणांच्या (Encroachment News) संदर्भातील स्पष्टीकरणात माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक 23 मधील लेवे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पालखीत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. निकम यांना चार वाजेपर्यंत निलंबित करा अन्यथा त्यांना काळेफासू असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. यावेळी मुख्याधिकारी विनोद झळक यांना निवेदन देण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमणाच्या संदर्भात झालेला उल्लेख हा मूळवादाचा विषय आहे. यासंदर्भात लेवे यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी विनोद जळक यांना निवेदन सादर केले .या नियोजनात नमूद आहे की लेवे यांच्या प्रतिष्ठेला निकम यांच्या या वक्तव्याने धक्का पोहोचला आहे .त्यामुळे निकामी यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा आम्ही सातारा शहरात निकम जिथे दिसतील तेथे त्यांना काळेफासू असा इशारा दिल्याने प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असावा सुरू झाला आहे .

हे देखील वाचा : वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; धक्कादायक कारणही समोर

वसंत लेवे यांचे त्यांच्या प्रभागात असलेले वर्चस्व आणि सामाजिक प्रभाव लक्षात घेतल्यास, हा केवळ प्रशासकीय वाद नसून राजकीय स्वरूपही घेत असल्याचे दिसते. लेवे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र असून, त्यामुळे आंदोलनाला भावनिक रंग मिळाला आहे .“निलंबन करा, अन्यथा काळे फासू” हा इशारा प्रशासनासाठी गंभीर आहे. अशा प्रकारच्या इशाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पालिका आवारात जमून घोषणाबाजी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

प्रशासनाची कसोटी 

मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासमोर आता दोन पातळ्यांवर आव्हान आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांचा संताप नियंत्रित करणे आणि तात्काळ निलंबन हा निर्णय तात्पुरता दिलासा देऊ शकतो. मात्र, ठोस चौकशीशिवाय घेतलेला निर्णय प्रशासनाच्या प्रक्रियात्मक पारदर्शकतेवर परिणाम करू शकतो. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी. संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण,उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी समिती यातूनच या वादावर विश्वासार्ह तोडगा निघू शकतो.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ

प्रभाग 23 मधील नागरिकांचा पालिकेत आक्रोश

प्रभाग 23 मधील हा वाद केवळ अतिक्रमणापुरता मर्यादित नसून, प्रशासनातील पारदर्शकता, राजकीय प्रभाव आणि नागरिकांचा वाढता आक्रोश यांचा संगम आहे. प्रशासनाने संयम, पारदर्शकता आणि कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घेतला तरच परिस्थिती नियंत्रणात राहू शकते; अन्यथा हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Demand to suspend encroachment inspector prashant nikam satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • political news
  • Satara Municipal Council
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती
3

‘वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य’; श्रीहरी गोळे यांची माहिती

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल
4

‘तुम्ही दोन हात केले तर आम्हीही चार हात करू’; भाजपचा शशिकांत शिंदेंवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.