Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलसंकटावरून नगरसेवक आक्रमक!मास्टर प्लान तयार करण्यासह बोअरवेल पुनरुज्जीवन करण्याचा पालिकेकडे आग्रह

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही ठोस काम प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 08:32 AM
जलसंकटावरून नगरसेवक आक्रमक!मास्टर प्लान तयार करण्यासह बोअरवेल पुनरुज्जीवन करण्याचा पालिकेकडे आग्रह

जलसंकटावरून नगरसेवक आक्रमक!मास्टर प्लान तयार करण्यासह बोअरवेल पुनरुज्जीवन करण्याचा पालिकेकडे आग्रह

Follow Us
Follow Us:

मुंबईवरील जलसंकटाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी महापालिका सभागृहात उमटले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील जलस्रोतांच्या संवर्धनाचा एक स्वतंत्र मास्टर प्लान तयार करावा, तसेच शहरातील बंद पडलेल्या सर्व बोरवेलचे पुनरुज्जीवन करावे, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. या गंभीर समस्येवर भाजपचे नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश खनकर यांनी महापालिका सभागृहात एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. या निवेदनावर विविध प्रभागांतील ३० हून अधिक नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करत आपल्या भागातील पाणीटंचाईचे वास्तव मांडले.(फोटो सौजन्य – AI)

हाफकीन महामंडळाचे माजी संचालक सुनील महिंद्रकर यांना सोडवेना ‘राजयोग’; बदली होऊनही हाफकीनमध्येच ठाण मांडून

विरोधी पक्षांकडूनही तीव्र आक्षेप

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही ठोस काम प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. शहरात उंच इमारतींची संख्या वाढत असताना वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी काय दूरदृष्टी ठेवली आहे, असा सवाल विरोधी पक्षांनी केला.

पाण्याचा अपव्यय तातडीने थांबवा

बागांना पाणी देणे, रस्ते धुणे आणि वाहने स्वच्छ करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर तातडीने बंद करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याशिवाय मुंबईतील पारंपरिक तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवावी आणि सर्व बोरवेलचे ऑडिट करून त्यांच्यासाठी रिचार्ज आराखडा तयार करावा, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपच्या नगरसेविका रीटा मकवाना यांनी सांगितले की, ‘जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने बोरवेलचे पुनरुज्जीवन करून पाणी शुद्धीकरणासह ते उपलब्ध करून द्यावे.

घाटकोपर दुर्घटनेतून महापालिका काय शिकली? पश्चिम द्रुतगती महामार्गावर ‘डिजिटल’ होर्डिंगमुळे अपघात घडण्याची चालकांना भीती

मुंबईची तहान भागवणारे सातही तलाव सध्या तळ गाठत आहेत, २१ जून २०२६ रोजी मुंबईच्या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ ८.६८ टक्के (१.२५ लाख दशलक्ष लिटर) जलसाठा शिल्लक होता. १४.४७ लाख दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या या तलाव क्षेत्रांत गेल्या २४ तासांत एकाही ठिकाणी पावसाची नोंद झालेली नाही.उपलब्ध साठा केवळ ऑगस्टच्या मध्यापर्यंतच पुरू शकतो. गेल्या वर्षी २१ जून २०२५ रोजी हाच साठा २५.८७ टक्के होता, तर २०२४ मध्ये तो ५.३१ टक्के होता. या पाश्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सभागृहात प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Corporators take a firm stand on the water crisis urge the municipal body to prepare a master plan and revive borewells

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai News
  • Mumbai Water

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
2

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
4

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.