Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; सनद निलंबनाबाबत बार काऊन्सिलकडे दाद मागण्याचे आदेश

वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच सदावर्तेंना 'बार काऊन्सिल ऑफ इंडिया'कडे (Bar Council of India) दाद मागण्याचे आदेश दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2023 | 08:23 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:

मुंबई : वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच सदावर्तेंना ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’कडे (Bar Council of India) दाद मागण्याचे आदेश दिले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने केली. त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा आरोप करून पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे अध्यक्ष सुशील मंचेकर यांनी सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्र आणि गोवा वकील काऊन्सिलकडे तक्रार केली होती. त्यावर काऊन्सिलच्या तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांना वकील कायद्याच्या कलम ३५ नुसार, गैरवर्तणुकीप्रकरणी दोषी ठरवले. तसेच दोन वर्षांसाठी त्यांची सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानिर्णयाला सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर गुरुवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सनद निलंबित करण्याचा निर्णय ज्यांनी घेतला ते बार राज्य बार काऊन्सिलच्या निवडणूकीत आपले विरोधक सदस्य होते. तसेच समितीने निलंबनाचे आदेश देताना आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला दिलेली नाहीत, असा दावा सदावर्ते यांनी खंडपीठासमोर केला. सदावर्तेंच्या युक्तिवादाला विरोध करून त्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रं देण्यात आली असल्याचा दावा बार काऊन्सिलच्या वतीने ज्येष्ठ वकील दारियस खंबाटा यांनी केला.

तसेच संबंधित सर्व रेकॉर्ड न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर वकील कायद्यानुसार गुणवत्तेच्या आधारावर याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला आणि सदावर्ते अपिलीय प्राधिकरणाकडे (बार काऊन्सिल ऑफ इंडिया) दाद मागण्याचे आदेश दिले. तसेच बार काऊन्सिल ऑफ इंडियाने तातडीने सुनावणी न ऐकल्यास सदावर्तेंना पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची मूभा देऊन खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

Web Title: Court gives order to gunratna sadavarte to appeal to bar council against suspension of charter nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2023 | 08:23 PM

Topics:  

  • bar council of India
  • Court Decision
  • High court
  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.