Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Akola News: अकोला रेल्वेस्थानक व परिसर हा प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा भाग असल्याने येथे प्रवाशांच्या मोबाइल, सामान व मौल्यवान वस्तूंच्या चोरीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 02:33 PM
जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Follow Us
Follow Us:

Akola News: नागपूर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील सहा रेल्वे पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीत अकोला जीआरपी पोलिस ठाणे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जीआरपीमध्ये ६५६, अकोला ३२६, वर्धा २७९, बडनेरा १८५, गोंदिया १७० आणि इतवारी ६५ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. नागपूर रेल्वे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात नागपूर, अकोला, वर्धा, बडनेरा, गोंदिया आणि इतवारी या सहा रेल्वे पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यापैकी नागपूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले.(फोटो सौजन्य – AI)

अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल

अकोला जीआरपीचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे अकोल्याची आकडेवारी वर्धा, बडनेरा, गोंदिया आणि इतवारी या चारही पोलिस ठाण्यांपेक्षा अधिक आहे. अकोला जीआरपीकडून वेळोवेळी विविध कारवाया करून आरोपींना अटक केल्याची माहिती प्रसिद्ध केली जाते. मात्र, किरकोळ कारवायांच्या प्रसिद्धीपेक्षा एकूण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दीर्घकालीन आणि परिणामकारक उपाययोजना कितपत प्रभावी ठरत आहेत, हा प्रश्न या आकडेवारीमुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे अकोला जीआरपीच्या कामगिरीचे पुनरावलोकन करणे गरजेचे झाले आहे.

अकोला रेल्वेस्थानक व परिसर हा प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा भाग असल्याने येथे प्रवाशांच्या मोबाइल, सामान व मौल्यवान वस्तूंच्या चोरीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालणे हे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता गुन्हे प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, संशयितांवर लक्ष आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना, गस्त वाढविणे आवश्यक

अकोला रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना, रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था आणि संवेदनशील ठिकाणी सातत्याने गस्त वाढविणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जीआरपीच्या कार्यपद्धतीचे आणि गुन्हे नियंत्रणाच्या उपाययोजनांचे नियमित पुनरावलोकन होणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Crime rises within grp jurisdiction 326 cases registered in akola effective crime control poses a major challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Akola City
  • Akola crime
  • Amaravati

संबंधित बातम्या

Amravati News: मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार कशी? ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्यावर प्रश्न, १,२८८ शाळांकडे मैदान
1

Amravati News: मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार कशी? ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्यावर प्रश्न, १,२८८ शाळांकडे मैदान

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
2

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.