Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : उन्हाच्या तडाख्याने 9 मगरीची पिल्ले दगावली; वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थ संतप्त

तालुक्यातील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथे काळ्या ओढ्यालगतच्या उसाच्या फडात मगरीच्या विणीतील नऊ पिलांचा तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वनविभागाने पाच पिलांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 03:28 PM
उन्हाच्या तडाख्याने 9 मगरीची पिल्ले दगावली; वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थ संतप्त

उन्हाच्या तडाख्याने 9 मगरीची पिल्ले दगावली; वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थ संतप्त

Follow Us
Follow Us:
  • माहिती देऊनही पाच तास अधिकारी फिरकले नाहीत
  • ‘संरक्षित प्राण्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?’ असा सवाल उपस्थित
  • वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थ संतप्त
पलूस : तालुक्यातील आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यालगतच्या उसाच्या फडात मगरीने केलेल्या विणीतील नऊ पिलांचा तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. तर पाच पिलांना वनविभागाने सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. मात्र, घटनेची माहिती तातडीने देऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तब्बल पाच तास घटनास्थळी न पोहोचल्याने ग्रामस्थ, शेतकरी आणि वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यालगत असलेल्या एका उसाच्या शेतात मगरीने अंडी घालून विण केली होती. रविवारी सकाळी सोयाबीन भांगलणीसाठी गेलेल्या महिलांना शेतात मगरीचा वावर दिसून आला. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता काही मगरीची पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. ही माहिती शेतकरी व वन्यजीवप्रेमींनी तातडीने वनविभागाला दिली. मात्र, गंभीर स्वरूपाची घटना घडूनही दुपारी दीड वाजेपर्यंत वनविभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर केवळ एक वनमजूर घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत वाढत्या तापमानामुळे आणि कडाक्याच्या उन्हामुळे नऊ पिलांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत पिलांचे पंचनामे करून त्यांचे दफन करण्यात आले. तसेच विणीतील पाच पिल्ले जिवंत आढळून आल्याने त्यांना काळजीपूर्वक ताब्यात घेऊन जवळील ओढ्यात सोडण्यात आले. पिलांना जन्म देणारी मादी मगरही सुरक्षित असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. उसाच्या शेतात मगरीची विण आढळणे आणि त्यातून पिल्लांचा जन्म होणे ही दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे या घटनेकडे वन्यजीव अभ्यासकांचेही लक्ष वेधले गेले आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या घटनेत वनविभागाने वेळेत प्रतिसाद न दिल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Shirur Police Trandfer: पाच वर्षे ठाण मांडणाऱ्यांना डच्चू; संदीपसिंह गिल्ल यांच्याकडून ४१९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

‘अनुसूची-१ मधील प्राणी, तरीही दुर्लक्ष’

मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची-१ मधील अतिसंरक्षित प्राणी आहे. अशा प्राण्याच्या पिलांचा मृत्यू होऊनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “जर वाघाची पिलं मृतावस्थेत आढळली असती तर संपूर्ण यंत्रणा तातडीने धावली असती. मग मगरीच्या पिलांच्या मृत्यूला किंमत नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Web Title: Crocodile babies death heatwave anugadewadi amanapur forest department delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Forest Department
  • Sangli

संबंधित बातम्या

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
1

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.