Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारही झाल्या सहभागी

Dagdusheth Halwai Ganpati : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टकडून अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 हजारांहून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 28, 2025 | 11:45 AM
Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha pathan by 35 thousand women with mp sunetra pawar pune news

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha pathan by 35 thousand women with mp sunetra pawar pune news

Follow Us
Follow Us:

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : पुणे : पुण्यातील लोकप्रिय असा दगडूशेठ हलवाई गणपती हा पद्मनाभ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाला आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही मंत्रोमुग्धतेने झाली आहे. ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पासमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात  आले होते. ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर दिसून आला.

ओम गं गणपतये नमः आणि मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांचा उत्साह पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करण्यात आला. या सोहळ्यामध्ये खासदार सुनेत्रा पवार यांची खास उपस्थिती होती. सुनेत्रा पवार यांनी अथर्वशीर्ष पठन करत भक्तीमय वातावरणाची अनुभूती घेतली.

पुण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तरी देखील महिलांचा मोठ्या उत्साह दिसून आला. पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. अथर्वशीर्ष पठनाच्या उपक्रमाचे यंदा ४० वे वर्ष होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या सोहळ्यामध्ये खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ” केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणेशाचरणी लीन होत असताना बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे हे वर्ष जावो, अशी प्रार्थना खासदार सुनेत्रा पवार यांनी केली.

परदेशी अभिनेत्री पठणासाठी उपस्थित

पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला ऍना मारा या इटली येथील अभिनेत्रीने देखील हजेरी लावत सहभाग घेतला. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठा उत्साह दिसून येत आहे. मानाच्या गणपतींना देखील भाविकांनी पहिल्याच दिवशी दर्शनाला मोठी गर्दी केली आहे.

Web Title: Dagdusheth halwai ganpati atharvashirsha pathan by 35 thousand women with mp sunetra pawar pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • dagadu sheth halwai temple
  • ganesh charuthi
  • pune news

संबंधित बातम्या

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
1

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश
2

Ganeshotsav 2026 : Mira Bhayandar मध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी 24 ठिकाणी व्यवस्था; 19 कृत्रिम अन् ५ नैसर्गिक जलस्रोतांचा समावेश

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
3

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
4

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.