Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

Dattatray Bharne on Maharashtra Drought Situation :राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 08:17 PM
Dattatray Bharne on Maharashtra Drought Situation

Dattatray Bharne on Maharashtra Drought Situation

Follow Us
Follow Us:
  • खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम
  • भरणेंचा शेतकऱ्यांना दिलासा
  • नुकसानभरपाईसाठी सरकार सज्ज
बारामती : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यात आले आहे,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री भरणे यांनी देऊळगाव, मोरगाव, मुर्टी, नावळी आणि कोळविहीरे या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसेच पाणी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे उपस्थित होते. कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पिकाची पाहणीकरून पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर झालेल्या परिणामाची माहिती घेतली.

पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमध्ये २ ते ३ आठवड्यांचा पावसाचा खंड पडला आहे. भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये ३ ते ४ आठवड्यांचा पावसाचा खंड असून, ४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असलेल्या तालुक्यांमध्ये बारामती, शिरूर, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खेड या तालुक्यांचा समावेश असल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली.

पावसातील दीर्घ खंडामुळे पुणे विभागातील खरीप पिकांवरही परिणाम झाला आहे. या परिस्थितीची केवळ आकडेवारीच्या आधारे पाहणी न करता प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, कृषी व संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची अचूक नोंद करण्यात येत आहे. पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन पंचनामे तसेच आवश्यक प्रस्तावांची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

Onion Prices High : कांद्याचे भाव वधारले, 80 च्या वर तर लिंबू 700 व कोथिंबीर 350 किलो……

Web Title: Dattatray bharne maharashtra drought farmer relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Dattatray Bharne
  • drought news

संबंधित बातम्या

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या
1

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
2

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
3

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
4

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.