जावळीत शिवेंद्रराजेंच्या निष्ठावंताचा डंका! ज्ञानदेव रांजणे यांचा जिल्हा बँक निवडणुकीत ३० मतांनी दणदणीत विजय
मेढा, दत्तात्रय पवार : जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या राजकारणाची सुरुवात ही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली, तर विठ्ठल गोळे हे प्रदेशअध्यक्ष शिंदेंचे निष्ठावंत मानले जातात.जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघातून रांजणे विरुद्ध गोळे अशी दुहेरी लढत झाली होती. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत ज्ञानदेव रांजणे यांनी गोळे यांच्या विरोधात तब्बल ३० मतांनी दणदणीत विजय मिळवला. (Satara Dictrict Bank Election)
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत कुसुंबी गटातून रांजणे यांच्या सुविद्य पत्नी अर्चना रांजणे या पराभूत झाल्यानंतर अनेकांनी या गटामध्ये आपली राजकीय ताकद अधिक असल्याचा दावा केला, मात्र ती केवळ सूज असल्याचे समोर आले आहे.केवळ गणपती उत्सवात आरतीला हजेरी लावून नेते म्हणून मिरवणाऱ्यांना सोसायटीचा साधा एक ठरावही घेता आला नाही.
जिल्हा बँकेसाठी रांजणे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवली व संपूर्ण निवडणुकीचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो प्लानिंग केले. या मायक्रो प्लॅनिंग मुळेच आजच्या निकालात रांजणे यांनी ४७ पैकी ३८ मते मिळवली.तर गोळेंना ८ मते मिळाली.मालचौडी सोसायटी मतदारास नावातील बदलामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
रांजणे यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता असताना शिंदे यांनी ऐनवेळी आपले निष्ठावंत समर्थक माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गोळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले.
विठ्ठल गोळे यांनी देखील आपल्या नेत्याचा आदेश मानून केवळ निष्ठेपाई निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत ज्ञानदेव रांजणे यांनी तब्बल ३० मतांनी विजय मिळवला.तर गोळे यांनी अवघी ८ मते मिळवता आली.
विजयानंतर रांजणे समर्थकांनी जावळी तालुक्यात गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
दरम्यान, आपल्या समर्थक उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मतदानाच्या दिवशी उपस्थित राहतील आणि समर्थकांचा मनोबल वाढवतील, अशी अपेक्षा त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र ते मतदानासाठी उपस्थित राहिले नसल्याने तसेच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे सांगण्यात येत असल्याने हा मुद्दाही निकालानंतर चर्चेत आला आहे.आपला निष्ठावंत समर्थक निवडणूक मैदानात असताना नेत्याची प्रत्यक्ष उपस्थिती ही कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या गैरहजेरीबाबत जावळीतील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
सोसायटीचे ठराव घेण्यापासून ते मतदारांना मतदान प्रक्रियेपर्यंत सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी युवा कार्यकर्ते सागर धनावडे, जयदीप शिंदे समीर आत्तार यांच्यावर सोपवण्यात आली होती. मतदार सहलीवर पाठवण्याच्या कारणावरून विरोधक एकीकडे राळ उठवत होते. मात्र निवडणूक प्रक्रियेचा हा एक भाग होता. तब्बल अडीच महिने सहलीवर नेलेल्या या मतदारांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेण्याचे काम ज्ञानदेव रांजणे यांचे शिलेदार सागर धनवडे, जयदीप शिंदे, समीर अत्तार यांनी प्रामाणिकपणे केले. त्यामुळे त्यांच्या या भक्कम साथीमुळे रांजणे यांचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला.
सांगली जिल्हा बँकेत रोहित पाटलांना धक्का; पडळकर, घोरपडे, संजयकाकांची बाजी !
Ans: ज्ञानदेव रांजणे यांनी विठ्ठल गोळे यांचा तब्बल ३० मतांनी पराभव केला. त्यांना ३८ मते मिळाली.
Ans: ज्ञानदेव रांजणे हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवेंद्रसिंहराजे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Ans: विठ्ठल गोळे यांना या निवडणुकीत अवघी ८ मते मिळाली, तर ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवत विजय मिळवला.






